पाकने दिले आयटीएफच्या निर्णयास आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:04 IST2019-11-12T04:04:11+5:302019-11-12T04:04:14+5:30

सुरक्षेच्या कारणास्तव भारताविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबाद ऐवजी अन्य स्थळी खेळविण्याचा निर्णय आंतरराष्टÑीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) नुकताच घेतला.

ITF's decision to challenge Pak | पाकने दिले आयटीएफच्या निर्णयास आव्हान

पाकने दिले आयटीएफच्या निर्णयास आव्हान

कराची : सुरक्षेच्या कारणास्तव भारताविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबाद ऐवजी अन्य स्थळी खेळविण्याचा निर्णय आंतरराष्टÑीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) नुकताच घेतला. पाकिस्तानने या निर्णयास आव्हान दिले आहे. यानंतर आयटीएफने पाकिस्तानमधील सुरक्षेची चिंता कितपत गंभीर आहे, असे भारताला विचारले.
या नव्या प्रकरणामुळे आता २९-३० नोव्हेंबरला होणाऱ्या भारत-पाक डेव्हिस कप लढतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. आयटीएफने सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना अन्यत्र खेळविण्याचा निर्णय ४ नोव्हेंबरला घेतला होता. या निर्णयाविरुद्ध पाकने आव्हान दिले आहेत. या प्रकरणी १८ नोव्हेंबरला अंतिम निर्णय समोर येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
पाक टेनिस महासंघाचे अध्यक्ष सलीम सैफुल्लाह यांनी आम्ही अपील दाखल केले असून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर अपेक्षित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘भारताविरुद्धचे यजमानपद भूषविताना सुरक्षेचा कुठलाही मुद्दा नाही. राजकीय संबंधांमुळे यजमानपदाचा अधिकार हिसकावला जाऊ नये. शनिवारी कर्तारपूर कॉरीडॉरचे लोकार्पण यशस्वीपणे झाल्याने इस्लामाबादेत डेव्हिस चषकाचे आयोजन शक्य असल्याचे स्पष्ट झाले. सामना हलविण्यामागे कुठलाही व्यावहारिक तर्क नाही.’

Web Title: ITF's decision to challenge Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.