शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भारताच्या मनीष सुरेशकुमारची धक्कादायक विजयासह चँलेंजर टेनिस स्पर्धेत आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 03:48 IST

जिल्हा क्रिकेट संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मंगळवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत भारताच्या मनीष सुरेशकुमार याने खळबळजनक विजय मिळवला.

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए ) आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा क्रिकेट संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित चॅलेंजर टेनिस स्पर्धेत मंगळवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत भारताच्या मनीष सुरेशकुमार याने खळबळजनक विजय मिळवला. जपानच्या सोळाव्या मानांकित रिओ नागोची याच्यावर विजय मिळवताना सुरेशकुमारने सर्वांचे लक्ष वेधले.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत मनीषने रिओचे आव्हान ६-३, ७-६ (४) अशा फरकाने संपुष्टात आणले. या शानदार विजयासह त्याने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत ७४८ व्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईच्या या २० वर्षीय खेळाडूने आपल्यापेक्षा बलाढ्य आणि जागतिक क्रमवारीत ४०८व्या स्थानी असलेल्या जपानी प्रतिस्पर्ध्याला सरळ दोन सेटमध्ये नमविले. ही लढत १ तास ३६ मिनिटे चालली.पाचव्या मानांकित इंग्लंडच्या जे क्लार्कने फ्रान्सच्या केल्विन हेमरीवर ६-४, ६-४ ने सरशी साधली. दुसºया फेरीतील एकतर्फी झालेल्या सामन्यात ११व्या मानांकित जपानच्या सुईची सेकिगुचीने रशियाच्या रोमन ब्लोखिनचा ६-३, ६-० असा धुव्वा उडविला. सुईची याच्या वेगवान खेळापुढे रोमन याला सामन्यात आपला खेळ सादर करण्याची फारशी संधीच मिळाली नाही. अन्य एका लढतीत पात्रता फेरीतून स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या माजी राष्ट्रीय विजेत्या दलविंदर सिंग यानेही सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवताना भारताच्याच कृणाल आनंदचा ६-३, ६-४ असा पराभव केला.