शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

जोकोविच-नदाल अंतिम सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:18 IST

नोवाक जोकोविच याने शुक्रवारी आपल्या विक्रमी सातव्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाकडे आणखी एक पाऊल टाकले.

मेलबर्न : नोवाक जोकोविच याने शुक्रवारी आपल्या विक्रमी सातव्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाकडे आणखी एक पाऊल टाकले. त्याने फ्रान्सच्या २८व्या मानांकित लुका पुई याला ६-०, ६-२, ६-२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जोकोविचचा सामना नदालसोबत होईल.जगातील नंबर वन खेळाडूने शानदार खेळ करत २०१६ नंतर मेलबर्नमध्ये पहिल्या अंतिम फेरीत जागा मिळवली. जोकोविच याने २४ विनर लगावले आणि फक्त पाच अनफोर्स्ड चुका केल्या. तो म्हणाला की, ‘मी निश्चितपणे या कोर्टवर जेवढे सामने खेळले आहेत. त्यातील हा सर्वांत चांगला सामना होता.’जोकोविच गेल्या वर्षी चौथ्या फेरीत पराभूत झाला होता. आता त्याचा सामना दुसऱ्या मानांकित नदालसोबत होणार आहे. या दोघांमध्ये कारकिर्दीतील हा ५३वा सामना असेल आणि ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीतील आठवा सामना आहे.या दोघांमध्ये २०१२ आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम सामना झाला होता. त्यात जोकोविच याने पाच तास ५३ मिनिटे चाललेल्या सामन्यात पाचव्या सेटमध्ये ७-५ असा विजय मिळवला. जोकोविच याला लुका पुई याला पराभूत करण्यासाठी फक्त ८३ मिनिटे लागली. १४ वेळच्या ग्रॅण्डस्लॅम विजेत्या जोकोविच याने उपांत्य पूर्व फेरीत केई निशीकोरीला पराभूत केले होते. जोकोविचने पहिला सेट फक्त २१ मिनिटातच ६-० असा जिंकला होता. दुसºया सेटमध्ये पुई याने पहिली सर्व्हिस वाचवली. मात्र जोकोविच याने लगेचच आपल्या नावे केली.>स्टोसुर- झांग यांना दुहेरीचे जेतेपदआॅस्ट्रेलियाची सामंथा स्टोसूर व चीनच्या झांग शुआइ या जोडीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. स्टोसूर- झांग या जोडीने बिगर मानांकित हंगेरीची टिमिया बाबोस व फ्रान्सची ख्रिस्तिना म्लादेनोविच या गतविजेत्या जोडीला पराभूत करत आॅस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे जेतेपद आपल्या नावे केले.स्टोसूर-झांग जोडीने बाबोस-म्लादेनोविच या जोडीचा ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्रथमच ग्रॅँडस्लॅममधील दुहेरीचे जेतेपद मिळवलेली शुआई म्हणाली, ‘ हे माझ्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे.’ स्टोसूरने यापूर्वी लिसा रेमंडच्या साथीने २००५ मध्ये अमेरिकन ओपन व २००६ मध्ये फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवले होते>या मैदानावर मी खेळलेल्या सामन्यापैकी हा सर्वोत्तम सामना होता. मी जसे ठरवले होते तसेच घडल्यामुळे मी आनंदी आहे.- जोकोविच

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच