शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

US Open Final: जोकोविचचं विक्रमी चौकाराचं स्वप्न भंगलं; US Open ला मिळाला नवा चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 9:03 AM

Novak Djokovic lost US Open Final: आजच्या एका सामन्याने जोकोविचला दोन इतिहास रचण्यापासून दूर ठेवले आहे. हा पराक्रम रॉजर फेडरर, राफेल नादाल यांनाही जमलेला नाही.  

US Open Men's Singles Final: न्यूयॉर्क : युएस ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत रशियाच्या डेनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) याने जगज्जेता असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचचा  6-4, 6-4, 6-4 अशा सेटमध्ये पराभव करून मेदवेदेवने पहिला ग्रँडस्लॅम पटकावला. याचबरोबर जोकोविचचे 21 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. (Novak Djokovic lost US Open Final by Daniil Medvedev.)

नोवाक जोकोविच नेहमीप्रमाणे आपल्या तालात दिसला नाही. तर तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचलेल्या 25 वर्षीय मेदवेदेवने त्याच्या करिअरमधील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले आहे. महत्वाचे म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला मेदवेगदेव ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये गेला होता. परंतू जोकोविचने त्याला विजयापासून दूर ठेवले होते. याचा बदला घेत मेदवेदेवने जोकोविचला दोन इतिहास रचण्यापासून दूर ठेवले आहे. 

अन् जोकोविच दोन विक्रमांना मुकला...आजच्या या फायनलमध्ये जोकोविच दोन विक्रम रचणार होता. यंदाच्या कॅलेंडर वर्षात जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकली होती. आजचा सामना जिंकून तो युएस ग्रँडस्लॅमचे जेतेपदही खिशात घालणार होता. पुरुष एकेरीत हा पराक्रम फक्त रॉड लेवर यांनाच जमला आहे. त्यांच्या पंक्तीत जोकोविच बसणार होता. परंतू मेदवेदेवने त्याला रोखले. हा पराक्रम रॉजर फेडरर, राफेल नादाल यांनाही जमलेला नाही.  

जोकोविच आज आणखी एक विक्रम रचणार होता. आजवर रॉजर फेडरर, राफेल नादाल यांच्यासह जोकोविचने प्रत्येकी 20-20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. परंतू आजचा सामना जोकोविच जिंकला असता तर जगातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम त्याने केला असता. तो देखील हुकला आहे.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस