US Open Final: जोकोविचचं विक्रमी चौकाराचं स्वप्न भंगलं; US Open ला मिळाला नवा चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 09:03 AM2021-09-13T09:03:39+5:302021-09-13T09:05:53+5:30

Novak Djokovic lost US Open Final: आजच्या एका सामन्याने जोकोविचला दोन इतिहास रचण्यापासून दूर ठेवले आहे. हा पराक्रम रॉजर फेडरर, राफेल नादाल यांनाही जमलेला नाही.  

Daniil Medvedev ends Novak Djokovic's win for year Slam at US Open | US Open Final: जोकोविचचं विक्रमी चौकाराचं स्वप्न भंगलं; US Open ला मिळाला नवा चॅम्पियन

US Open Final: जोकोविचचं विक्रमी चौकाराचं स्वप्न भंगलं; US Open ला मिळाला नवा चॅम्पियन

Next

US Open Men's Singles Final: न्यूयॉर्क : युएस ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत रशियाच्या डेनिल मेदवेदेव (Daniil Medvedev) याने जगज्जेता असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचचा  6-4, 6-4, 6-4 अशा सेटमध्ये पराभव करून मेदवेदेवने पहिला ग्रँडस्लॅम पटकावला. याचबरोबर जोकोविचचे 21 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. (Novak Djokovic lost US Open Final by Daniil Medvedev.)

नोवाक जोकोविच नेहमीप्रमाणे आपल्या तालात दिसला नाही. तर तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये पोहोचलेल्या 25 वर्षीय मेदवेदेवने त्याच्या करिअरमधील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले आहे. महत्वाचे म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला मेदवेगदेव ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये गेला होता. परंतू जोकोविचने त्याला विजयापासून दूर ठेवले होते. याचा बदला घेत मेदवेदेवने जोकोविचला दोन इतिहास रचण्यापासून दूर ठेवले आहे. 

अन् जोकोविच दोन विक्रमांना मुकला...
आजच्या या फायनलमध्ये जोकोविच दोन विक्रम रचणार होता. यंदाच्या कॅलेंडर वर्षात जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकली होती. आजचा सामना जिंकून तो युएस ग्रँडस्लॅमचे जेतेपदही खिशात घालणार होता. पुरुष एकेरीत हा पराक्रम फक्त रॉड लेवर यांनाच जमला आहे. त्यांच्या पंक्तीत जोकोविच बसणार होता. परंतू मेदवेदेवने त्याला रोखले. हा पराक्रम रॉजर फेडरर, राफेल नादाल यांनाही जमलेला नाही.  

जोकोविच आज आणखी एक विक्रम रचणार होता. आजवर रॉजर फेडरर, राफेल नादाल यांच्यासह जोकोविचने प्रत्येकी 20-20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. परंतू आजचा सामना जोकोविच जिंकला असता तर जगातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम त्याने केला असता. तो देखील हुकला आहे.

Web Title: Daniil Medvedev ends Novak Djokovic's win for year Slam at US Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.