शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Australian Open: जोकोविच तिसऱ्या फेरीत, सेरेना विलियम्सची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 04:21 IST

Australian Open: तियाफोईयाआधी जगातील नंबर वन खेळाडूविरुद्ध कधीही खेळला नव्हता आणि त्याने कधीही अव्वल पाचमध्ये समाविष्ट खेळाडूला नमवले नव्हते. मात्र, तो जोकोविचविरुद्ध दुसरा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला.

मेलबोर्न : अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत अमेरिकेच्या फ्रांसिस तियाफोई याला नमवले. महिला गटात सेरेना विलियम्सदेखील तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.तियाफोईयाआधी जगातील नंबर वन खेळाडूविरुद्ध कधीही खेळला नव्हता आणि त्याने कधीही अव्वल पाचमध्ये समाविष्ट खेळाडूला नमवले नव्हते. मात्र, तो जोकोविचविरुद्ध दुसरा सेट जिंकण्यात यशस्वी ठरला. जोकोविचने २३ वर्षीय तियाफोईला चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-३, ६-७, ७-६, ६-३ असे पराभूत केले. मात्र, ही लढत जिंकण्यासाठी जोकोविचला साडेतीन तासांपर्यंत घाम गाळावा लागला.अन्य लढतीत अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकावणारा डोमेनिक थीमने डोमेमीनिक कोफर याचा ६-४, ६-०, ६-२ असा पराभव केला. तीन वेळेसचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन आणि २०१४ चा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता स्टेन वावरिंका याने पाचव्या सेटच्या टायब्रेकमध्ये मोठी आघाडी आणि पुन्हा तीन मॅच पॉइंट गमावले. त्यामुळे त्याला मार्टन फुकसोविचविरुद्धची लढत ५-७, १-६, ६-४, ६-२, ६-७ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत १० व्या मानांकित सेरेनाने दुसऱ्या फेरीत निना स्टोजानोविच हिचा ६-३, ६-० असा पराभव केला. तथापि, सेरेनाची मोठी बहीण व्हीनस विलियम्सला पराभवाचा सामना करावा लागला. तिला सारा इरानी हिने ६-१, ६-० असे नमवले. दुखापतीनंतर पुनरागमन करणारी माजी अमेरिकन ओपन चॅम्पियन बियांका आंद्रेस्क्यू हिला दुसऱ्या फेरीत तैवानच्या सीह सू-वेई हिने ६-३, ६-२ असे पराभूत केले. आठ वर्षांत प्रथमच ग्रँडस्लॅम खेळणाऱ्या कॅनडाच्या रेबेका मारिनो हिला १९ व्या मानांकित मार्केटा वांद्रोसोवा हिने ६-१, ७-५ असे नमवले. अमेरिकेची २० वर्षीय आन ली हिने एलिज कॉर्नेट हिच्यावर ६-२, ७-६ असा विजय मिळवत सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारली. बोपन्नाचे दुहेरीत आव्हान संपुष्टातरोहन बोपन्ना आणि बेन मॅकलाचलन या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्याच लढतीत जी सुंग नॅम आणि मिन क्यू सोंग या जोडीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवाबरोबरच बोपन्नाचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.बोपन्ना आणि जपानचा त्याच्या जोडीदाराला कोरियाची वाईल्डकार्डप्राप्त जोडीविरुद्ध १ तास व १७ मिनिटांत ४-६, ६-७ असा पराभव पत्करावा लागला. कठोर विलगीकरणामुळे कोर्टवर जास्त सराव न करता आल्याने बोपन्नाला लय मिळवण्यात अडचण आली. मॅकलाचलन यालादेखील सूर गवसला नाही. याची किंमत या जोडीला मोजावी लागली. बोपन्नाने विलगीकरणाच्या १४ दिवसांपर्यंत आपल्या खोलीत राहिला आणि ३० जानेवारी रोजी त्याला कोर्टवर उतरण्याची परवानगी मिळाली होती. या स्पर्धेत भारताचे आव्हान आता पुरुष दुहेरीत दिविज शरण आणि महिला दुहेरीत पदार्पण करणाऱ्या अंकिरा रैना यांच्या रुपाने जिवंत आहे.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच