अर्जुन काधे आयटीएफ फ्युचर्सचा उपविजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:53 IST2018-05-07T00:53:35+5:302018-05-07T00:53:35+5:30
भारताचा अर्जुन काधे याने नायजेरियातील अबुजा मध्ये झालेल्या आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या जोआओ मेनजेसला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपविजेतेपद पटकावले.

अर्जुन काधे आयटीएफ फ्युचर्सचा उपविजेता
नवी दिल्ली : भारताचा अर्जुन काधे याने नायजेरियातील अबुजा मध्ये झालेल्या आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या जोआओ मेनजेसला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपविजेतेपद पटकावले.
या सत्रात आयटीएफ सर्किटमध्ये आपली चौथी अंतिम लढत खेळणाऱ्या ३९७ रँकिंग असणाºया काधे याला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून ३-६,१-६ असा पराभव पत्करावा लागला. ब्राझीलचा जोआओ हा रँकिंगमध्ये काधेपेक्षा फक्त तीन स्थानांनी वर आहे. काधे म्हणाला, पहिला सेट खुपच रोमांचक होता. तो खुपच चांगला खेळला. माझ्यासाठी त्याची सर्व्हिस ब्रेक करणे कठीण झाले होते. दुसºया सेटमध्ये मी सलग गेम गमावले.’ हा २४ वर्षांचा खेळाडू तिसºयांदा उपविजेता राहिला. त्याने कोलकाता आणि त्रिवेंद्रममध्ये देखील उपविजेतेपद पटकावले होते.
काधे याने फेब्रुवारीत भुवनेश्वरमध्ये विजेतेपद पटकावले होते.
तो पुढे म्हणाला, ही शिकण्याची प्रक्रिया आहे. सलग चांगला खेळ करणे देखील महत्त्वाचे आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही एकेरी आणि दुहेरी दोन्हीत खेळत असता.’