शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक भारतीय चॅम्प : टेनिसपटू शरणला विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 08:48 IST

टेनिसपटू दिविज शरणच्या रुपात भारताला आणखी एक विजेता मिळाला आहे. त्याने अमेरिकेच्या स्कॉट लिपिस्कीसोबत युरोपियन ओपन स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

अँटवर्प (बेल्जियम) - टेनिसपटू दिविज शरणच्या रुपात भारताला आणखी एक विजेता मिळाला आहे. त्याने अमेरिकेच्या स्कॉट लिपिस्कीसोबत युरोपियन ओपन स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अँटवर्प येथील या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी मेक्सिकोचा सँतियागो गोंझालेझ व चिलीचा ज्युलियो पेराल्टा यांच्यावर 6-4, 2-6, 10-5 असा विजय मिळवला.

विशेष म्हणजे शरण-लिपिस्की जोडीने या स्पर्धेतील आपले चारही सामने टाय- ब्रेकमध्ये जिंकले. त्यांना 250 एटीपी गूण व 31910 युरोंच्या एकत्रित बक्षिसाची प्राप्ती झाली. शरणचे हे तिसरे एटीपी विजेतेपद आहे.  

दोन आठवड्यांपूर्वी शरण- लिपिस्की यांनी तैवानमधील एटीपी चॕलेंजर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर बेल्जियममध्ये त्यांनी आपल्या खेळाचा दर्जा अधिक उंचावत अंतिम फेरीत धडक मारली आणि विजेतेपदावर कब्जा केला. 

इकडे खेळण्याचा हा फारच चांगला अनुभव होता. मी प्रथमच बेल्जियममध्ये खेळलो आणि मजा आली.  प्रत्येक सामना रंगतदार ठरला. चारही सामन्यात आम्ही चांगला खेळ केला याचा मनापासून आनंद आहे, असे या विजेतेपदानंतर शरण म्हणाला. याआधी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दिविज शरणने पूरव राजाच्या जोडीने दुसऱ्या एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले होते.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत