भन्नाट! अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह ZTE Axon 30 5G स्मार्टफोन लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: July 28, 2021 06:59 PM2021-07-28T18:59:05+5:302021-07-28T18:59:45+5:30

ZTE Axon 30 5G Under display camera: ZTE ने 16 मेगापिक्सल अंडर स्क्रीन कॅमेऱ्यासह ZTE Axon 30 5G फोन सादर केला आहे.

zte axon 30 5g phone launched with snapdragon 870 and under display camera | भन्नाट! अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह ZTE Axon 30 5G स्मार्टफोन लाँच 

ZTE Axon 30 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Next

ZTE आपला दुसऱ्या पिढीच्या अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने 16 मेगापिक्सल अंडर स्क्रीन कॅमेऱ्यासह ZTE Axon 30 5G फोन सादर केला आहे. या फोनमध्ये कंपनीने क्वालकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर आणि 64 मेगापिक्क्सल क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. हा फोन लवकरच जागतिक बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.  (ZTE Axon 30 5G Under display camera phone launched with 12GB RAM and SD870)

ZTE Axon 30 5G ची किंमत  

  • 6GB रॅम + 128GB स्टोरेज 2,198 युआन (अंदाजे 25,000 रुपये)  
  • 8GB रॅम + 128GB स्टोरेज 2,498 युआन (अंदाजे 28,500 रुपये) 
  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज 2,798 युआन (अंदाजे 32,000 रुपये) 
  • 12GB रॅम + 256GB स्टोरेज 3,098 युआन (अंदाजे 35,400 रुपये) 

ZTE Axon 30 5G चे स्पेसिफिकेशन्स  

ZTE Axon 30 5G मध्ये 6.92-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 1080x2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz आणि अस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा झेडटीई फोन अँड्रॉइड 11 आधारित मायओएस 11 वर चालतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4200mAh ची बॅटरी 55W चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

या फोनची खासियत म्हणजे फोनच्या स्क्रीन खाली असलेला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा. हा कॅमेरा 4-in-1 बायनिंग प्रोसेसचा वापर करून फोटो कॅप्चर करतो. या कॅमेरा मॉड्यूलवर जास्त पारदर्शक पिक्सल देण्यात आले आहेत, तसेच जुन्या Axon 20 च्या तुलनेत यांची डेन्सिटी दुप्पट करण्यात आली आहे.  

ZTE Axon 30 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा Sony IMX682 सेन्सर आहे. त्याचबरोबर 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.  

Web Title: zte axon 30 5g phone launched with snapdragon 870 and under display camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app