डिजिटल व्यवसायात झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम घडवणार क्रांती

By vaibhav.desai | Published: July 27, 2017 11:04 AM2017-07-27T11:04:51+5:302017-07-27T11:17:51+5:30

झोहो सॉफ्टवेअर कंपनीनं डिजिटल व्यवसायात क्रांती घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. झोहोनं आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली.

Zoho in digital business | डिजिटल व्यवसायात झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम घडवणार क्रांती

डिजिटल व्यवसायात झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम घडवणार क्रांती

Next
ठळक मुद्देझोहो सॉफ्टवेअर कंपनीनं डिजिटल व्यवसायात क्रांती घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.झोहोनं आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. प्रत्येक महिन्याला प्रत्येक वापरकर्त्याला 1,000 रुपये मोजावे लागणार


चेन्नई, दि. 26 - झोहो सॉफ्टवेअर कंपनीनं डिजिटल व्यवसायात क्रांती घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. झोहोनं आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. या ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून झोहोनं ग्राहकांना जवळपास 35 हून अधिक वेब अॅप्लिकेशन वापरता येऊ शकतील, अशी व्यवस्था करून दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व अॅप तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा वापरता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला एकदा साइन अप (नोंदणी) करावं लागणार आहे. खास करून व्यावसायिकांसाठी ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येक वापरकर्त्याला 1,000 रुपये मोजावे लागणार आहेत. झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून सेल्स, मार्केटिंग, कस्टमर सपोर्ट, अकाऊंटिंग, ह्युमन रिसोर्सेस आदी विभागांशी एकत्रित माहितीची देवाण-घेवाण करणं सोपं होणार आहे. 

झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्ता एका ग्रुपच्या माध्यमातून ही माहिती इतर विभागांपर्यंत पोहोचवू शकतो, अशी सिस्टीम यात बसवण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीनं ही ऑपरेटिंग सिस्टीम ऑनलाइन मार्केटमध्ये आणली आहे. या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेक भाषांचा समावेश करण्यात आला आहे. झोहो वन या ऑपरेटिंग सिस्टीमचा व्यावसायिकांना नक्कीच फायदा होणार आहे. व्यावसायिकांनीही डिजिटल क्षेत्रात अधिकाधिक प्रगती करता यावी, यासाठी या ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम सुरक्षित व सर्व सॉफ्टवेअर्सना उपयुक्त  आहे, असा दावा झोहो सॉफ्टवेअर कंपनीनं केला आहे. मात्र, ही ऑपरेटिंग सिस्टीम किती सुरक्षित आहे, याबाबत अनेक वापरकर्त्यांना शंका आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम सुरक्षित असल्यामुळे अँटी व्हायरसची व्यवस्था या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये केलेली नाही, अशी माहिती कंपनीनं दिली आहे.  

सॉफ्टवेअर निर्मितीच्या मार्केटमध्ये झोहो वन ही ऑपरेटिंग सिस्टीम नक्कीच एकप्रकारे क्रांती घडवेल. याचबरोबर ही ऑपरेटिंग सिस्टीम सर्व क्षेत्रांत उपयोगी ठरेल, असे झोहो वनचे सीईओ श्रीधर वेंबू यांनी सांगितले. दरम्यान, झोहो ऑपरेटिंग सिस्टीम अमेरिका, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन आणि भारतातील बाजार डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आली आहे.

Web Title: Zoho in digital business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app