शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

यू युनिक २चे आगमन

By शेखर पाटील | Published: July 26, 2017 9:58 PM

मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्‍या यू टेलिव्हेंचर कंपनीने यू युनिक २ हा स्मार्टफोन ५,९९९ रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.चिनी कंपन्यांच्या धडाक्यामुळे भारतीय स्मार्टफोन उत्पादक अक्षरश: धास्तावले असल्याची स्थिती सध्या आहे. यामुळे भारतीय ग्राहकांची कधी काळी पसंती मिळालेल्या मायक्रोमॅक्सच्या प्रगतीची गतीदेखील मंदावली आहे. या पार्श्‍वभूमिवर या कंपनीने आपल्या यू टेलिव्हेंचर ...

मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्‍या यू टेलिव्हेंचर कंपनीने यू युनिक २ हा स्मार्टफोन ५,९९९ रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

चिनी कंपन्यांच्या धडाक्यामुळे भारतीय स्मार्टफोन उत्पादक अक्षरश: धास्तावले असल्याची स्थिती सध्या आहे. यामुळे भारतीय ग्राहकांची कधी काळी पसंती मिळालेल्या मायक्रोमॅक्सच्या प्रगतीची गतीदेखील मंदावली आहे. या पार्श्‍वभूमिवर या कंपनीने आपल्या यू टेलिव्हेंचर या शाखेच्या माध्यमातून यू युनिक २ हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. अर्थात हे मॉडेलही एंट्री लेव्हल या प्रकारातील असल्याचे दिसून येत आहे. हे मॉडेल यू युनिक या स्मार्टफोनची सुधारित आवृत्ती असून यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. २७ जुलैच्या दुपारपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. शँपेन आणि कोल ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.

यू युनिक २ या स्मार्टफोनमध्ये ट्रुकॉलर हे कॉलर आयडी अ‍ॅप इनबिल्ट स्थितीत देण्यात आले आहे. यामुळे फोनबुकमध्ये नाव नसणार्‍या कॉलरचीही ओळख पटून हवा तो कॉल घेणे/नाकारणे सुलभ होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामुळे स्पॅम कॉल्सपासूनही मुक्ती मिळणार आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता, यामध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरणदेखील देण्यात आले आहे. यामध्ये क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. 

यू युनिक २ फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीच्या पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो युएसबी आदींचा समावेश आहे. तसेच यात एफएम रेडिओदेखील असेल. तसेच या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर, अँबियंट लाईट, प्रॉक्झीमिटी सेन्सर प्रदानन करण्यात आले आहेत. हे मॉडेल २,५०० मिलीअँपिअर प्रति-तास क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असून अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे.