शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:35 IST

Cyber Crime: जगातील ३० डेटाबेसमधून १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले; फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, ॲपल इत्यादी सेवांचा समावेश; कोट्यवधी युझर्सचा खासगी डेटा लीक होण्याची भीती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील ३० डेटाबेसमधून सुमारे १६ अब्ज लॉगइन क्रेडेन्शिअल्सची चोरी झाले आहे. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, ॲपल आणि असंख्य अन्य सेवांचा समावेश आहे. ‘सायबर न्यूज’च्या संशोधकांनी ही चोरी शोधून काढली. जानेवारी २०२५ पासून ते यावर काम करीत होते. ही सर्वांत मोठी पासवर्ड्स चोरी असण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी युझर्सचा डेटा लीक होण्याची भीती आहे. यामुळे डेटा चोरी, फिशिंग स्कॅम व खाते हॅक अशा संकटांचा सामना करावा लागू शकतो.

तुम्ही काय कराल?- तुम्ही तुमचा पासवर्ड तत्काळ बदला- तुमच्या खात्यांसाठी टू फॅक्टर ऑथिंटीकेशन चालू करा - सोपे पासवर्ड बदला.

चोरलेला डेटा अतिशय नवाचोरलेला डेटा अतिशय नवीन असून, याला इन्फोस्टिलर्स मालवेअरच्या माध्यमातून गोळा करण्यात आले आहे.  हा मालवेअर लोकांचा डेटा त्यांना न कळता चोरतो. चोरीच्या या डेटामध्ये युझरनेम आणि पासवर्ड आहेत. मालवेअर युझर्सच्या फोनमधून हे डेटा चोरत आहेत. हॅकर्स याचा वापर थेट वापर करतात किंवा डार्क वेबवर विकून टाकतात. ५५ अब्ज लोकांकडे इंटरनेट उपलब्धता आहे. याचाच अर्थ एकाच व्यक्तीच्या अनेक खात्यांचा ओळख डेटा चोरला गेलेला आहे. त्यामुळे पासवर्ड बदलणे गरजेचे आहे.

कोणते पासवर्ड चोरले?डेटाबेसकडे इंटरनेट सेवांच्या खात्यांचे लॉगइन नावे व पासवर्ड्स असतात. यात फेसबुक व इन्स्टाग्राम अशी समाज माध्यमे, जी-मेलसारखी ईमेल सेवादाते, गिटहबसारखे विकासक मंच, टेलिग्राम, व्हीपीएसारखे संदेश ॲप आणि सरकारी पोर्टल्स यांचा समावेश आहे. यातील यूआरएल, युजर नेम आणि पासवर्ड. त्याची चोरी हॅकर्सनी केली आहे.

गुन्ह्यांसाठी चोरलेल्या डेटाचा वापर चोरलेल्या डेटाचा वापर ऑनलाईन गुन्हेगारीसाठी केला जाऊ शकतो. खाती ताब्यात घेणे, ओळख चोरणे आणि घातक स्वरूपाची फसवणूक मोहीम राबविणे यासाठी हा डेटा वापरला जाऊ शकतो. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी