शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर टाईप करण्याची गरज नाही, फक्त बोलून असा पाठवा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 11:45 IST

WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. फक्त बोलूनही मेसेज पाठवता येतो. WhatsApp च्या Dictation फीचरच्या मदतीने टाईप न करता मेसेज पाठवता येणार आहे.

ठळक मुद्देWhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. फक्त बोलूनही मेसेज पाठवता येतो. WhatsApp च्या Dictation फीचरच्या मदतीने टाईप न करता मेसेज पाठवता येतो. Dictation फीचर Android आणि iOS या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. 

नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अनेकदा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांना WhatsApp वर टाईप करून मेसेज पाठवायला कंटाळा येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी आता टाईप करण्याची गरज नाही. फक्त बोलूनही मेसेज पाठवता येतो. WhatsApp च्या Dictation फीचरच्या मदतीने टाईप न करता मेसेज पाठवता येतो. हे फीचर Android आणि iOS या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. 

WhatsApp वर कीबोर्डमध्ये माइकचा आयकॉन देण्यात आला आहे. Dictation फीचर हे गुगल असिस्टेंट आणि Siri यासारख्या व्हॉइस असिस्टेंट्समध्ये आधीपासूनच आहे. WhatsApp मध्ये हे फीचर आता बिल्ट-इन आहे. कोणताही युजर्स कीबोर्डमधून दिलेल्या माइकवर क्लिक करून जे बोलायचे आहे ते बोलून मेसेजद्वारा दुसऱ्याला पाठवू शकता.

WhatsApp वर फक्त बोलून असा पाठवा मेसेज

- Dictation फीचरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp ओपन करा. 

- ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीच्या नंबरवर क्लिक करा. 

- कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर टाइप करण्यासाठी जसा कीबोर्ड ओपन करतो तसा तो ओपन करा. 

-   Android मोबाइलच्या युजर्सला WhatsApp वर काळ्या रंगाचा माइक वरच्या बाजुला दिसेल. तर आयओएस युजर्सला हा माइक खालच्या बाजूला दिसेल.

 - मेसेज पाठवण्यासाठी त्या माइकवर क्लिक करा. त्यानंतर जो मेसेज पाठवायचा आहे ते बोला. 

- ज्या भाषेत तुम्ही बोलाल त्या भाषेत तो मेसेज आपोआप टाइप होईल. मेसेज पूर्ण झाल्यानंतर सेंड बटनवर क्लिक करून तो पाठवता येऊ शकतो.

- WhatsApp वर मेसेज चुकल्यास तो एडीटचा पर्याय देण्यात आला आहे. 

- WhatsApp वर मोठा मेसेज टाईप करण्यासाठी खूप वेळ जातो. मात्र या फीचरमुळे आता हा वेळ वाचणार आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान