झिऑक्सचा अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा
By शेखर पाटील | Updated: October 2, 2017 19:00 IST2017-10-02T19:00:00+5:302017-10-02T19:00:00+5:30
झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने आपला अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,२९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला आहे

झिऑक्सचा अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा
झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने आपला अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,२९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला आहे. या मॉडेलचा लूक हा अतिशय आकर्षक असाच आहे. यात वक्राकार थ्रीडी ग्लासचे आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए म्हणजे ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील बॅटरी २२०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. तर यातील कॅमेरे ५ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यात २१ भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.
झिऑक्स अॅस्ट्रा कर्व्ह फोरजी या मॉडेलसाठी ग्राहकांना एका वर्षाची स्क्रीन ब्रेकेज वॉरंटी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन शँपेन आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. देशभरातील शॉपीजमधून हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.