शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

Xiaomi आणणार नवा फोल्डेबल Smartphone; १०८ मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार जबरदस्त फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 20:14 IST

Xiaomi Foldable Smartphone : यापूर्वी कंपनीनं मार्च महिन्यात एक फोल्डेबल स्मार्टफोन केला होता लाँच. कंपनी आता आणखी फोन आणण्याच्या तयारीत.

ठळक मुद्देयापूर्वी कंपनीनं मार्च महिन्यात एक फोल्डेबल स्मार्टफोन केला होता लाँच. कंपनी आता आणखी फोन आणण्याच्या तयारीत.

Xiaomi नं मार्च महिन्यात आपला पहिला स्मार्टफोन  Mi MIX Fold लाँच केला होता. आता कंपनी बाजारात आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनचा मॉडेल नंबर J18s असा आहे. या स्मार्टफोन लाँच होण्यासाठी अजून वेळ असला तरी अनेक ठिकाणी या स्मार्टफोनशी निगडीत माहिती समोर आली आहे.

डिजिटल चॅट स्टेशननुसार शाओमीचा हा स्मार्टफोन या वर्षाच्या चौथ्या तिमाहित लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये आतील बाजूला आणि बाहेरील बाजूला दोन्ही ठिकाणी डिस्प्ले असेल. यशिवाय हा स्मार्टफोन हाय रिफ्रेश रेटसह येणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 हा प्रोसेसही दिला आहे. 

कशी असेल बॅटरी क्षमता? या स्मार्टफोमध्ये शाओमी 5000mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. तसंच हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आली नाही. परंतु यापूर्वी आलेल्या लिक्सनुसार या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो आणि हा डिस्प्ले सॅमसंगनं (Samsung) तयार केला आहे. याशिवाय या स्मार्टफोनचा एक्स्टर्नल डिस्प्ले हा 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करेल. याशिवाय कंपनी सेल्फीसाठी अंडर डिस्प्ले कॅमेराही ऑफर करू शकते.

फोटोग्राफीच्या चाहत्यांसाठी या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरसह 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन लूकबाबत यापूर्वीच्या फोल्डेबल फोनप्रमाणेच असेल. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल