शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Xiaomi चा नवा ब्रँड आला; वनप्लस 6 ला देणार टक्कर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:30 IST

Xiaomi Poco F1: 29 ऑगस्टपासून विक्री सुरु होणार

नवी दिल्ली : फार कमी वेळात भारतीय बाजारपेठेत आपले बस्तान बसविलेल्या Xiaomi या मोबाईल कंपनीने Mi नंतर नवा ब्रँड भारतीय बाजारात आणला आहे. Poco असे या ब्रँडचे नाव असून Poco F1 हा त्यांचा पहिला मोबाईल भारतात आज लाँच करण्यात आला. 

Xiaomi Poco F1 या मोबाईलमध्ये 6 जीबी रॅम आणि 64/128 जीबी इंटर्लनल मेमरी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या व्हर्जनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्लनल मेमरी देण्यात आली आहे. कंपनीचा हा प्रिमियम श्रेणीमधला फोन वनप्लस 6 आणि असुसच्या जेनफोन 5 झेड या फोनना टक्कर देणार आहे. हा फोन अँड्रॉईड 8.1 ओरियो या सिस्टमवर चालणार आहे. या फोनची पहिली विक्री 29 ऑगस्टला दुपारी 12 वाजता केली जाणार आहे. यावेळी काही ऑफर्सही मिळणार आहेत.

विक्री आणि किंमतपोको एफ1 या मोबाईलची विक्री फ्लिपकार्ट आणि एमआय.कॉम सुरु होणार आहे. 6/64 जीबी मोबाईलची किंमत 20,999, 6/128 जीबी मोबाईलची किंमत 23,999 आणि 8/256 जीबी मोबाईलची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याचबरोबर एक आर्मड एडिशनची किंमत 29,999 ठेवण्यात आली आहे. 

ऑफर्सया फोनच्या विक्रीसाठी कंपनीने एचडीएफसी बँकेसोबत करार केला आहे. यानुसार 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच Reliacne Jio च्या वापरकर्त्यांना 8000 रुपयांचा कॅशबॅक आणि 6 टेराबाईट पर्यंतचा डेटा मोफत मिऴणार आहे. 

Poco F1 ची वैशिष्टे शाओमीच्या या नव्या फोनमध्ये फुल एचडी प्लस नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉचला सेटींगमध्ये जाऊन बंद करता येऊ शकते. क्वॉलकॉम चा नवा स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर दिला आहे. तसेच लिक्विड कूल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.  यामुळे गेम खेळताना फोन तापण्याची शक्यता कमी झाली आहे. तसेच या फोनसाठी 9.0 पायची अपडेटही मिळणार आहे. 

कॅमेरा12 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 365 आणि 5 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा असा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 4000 एमएएचची बॅटरी क्विक चार्ज होते. 

टॅग्स :xiaomiशाओमीOneplus mobileवनप्लस मोबाईलAndroidअँड्रॉईड