शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Xiaomi ने भारतात लाँन्च केला स्वस्त Smart TV 5A, फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:20 IST

Xiaomi ने आपल्या नव्या Smart TV ला देखील बाजारात आणलं आहे. कंपनीनं Xiaomi OLED Vision टीव्ही देखील लाँन्च केला आहे. 

Xiaomi ने आज आपल्या कंपनीचे अनेक डिव्हाइस भारतात लाँन्च केले आहेत. कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12 Pro 5G आणि Xiaomi Pad 5 Android टॅबलेट दाखल केला आहे. यासोबतच Xiaomi ने आपल्या नव्या Smart TV ला देखील बाजारात आणलं आहे. कंपनीनं Xiaomi OLED Vision टीव्ही देखील लाँन्च केला आहे. 

कंपनीनं या इव्हेंटमध्ये Xiaomi Smart TV 5A Series देखील आणली आहे. या टेलिव्हीजन सीरीजला तीन स्क्रीन साइजमध्ये आणलं आहे. यात ३२ इंचांपासून ४३ इंचांच्या साइजमध्ये स्मार्टटिव्ही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तिन्ही स्मार्टटिव्ही Android TV 11 OS आऊट-ऑफ-द-बॉक्स प्रणालीवर काम करतात. 

Xiaomi Smart TV 5A Series ची किंमत आणि उपलब्धताXiaomi Smart TV 5A यातील ३२ इंचाच्या टेलिव्हिजनची किंमत १५,४९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर याच्या ४० इंचाच्या मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये इतकी आहे. तर ४३ इंचाचा टीव्ही २५,९९९ रुपयांना मिळेल. तिन्ही टीव्हीचा सेल ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे. 

ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart शिवाय Mi.com आणि Mi स्टोअरमध्ये टेलिव्हिजन खरेदी करता येणार आहे. तसंच तुम्ही जर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं खरेदी करणार असाल तर अतिरिक्त २ हजार रुपयांचा डिस्काऊंट देखील मिळवता येणार आहे. 

Xiaomi Smart TV 5A Series चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनXiaomi Smart TV 5A Series मधील ३२ इंचाच्या टेलिव्हिजनमध्ये HD रेज्युलेशनसह उपलब्ध आहे. तर ४० इंच आणि ४३ इंचाचा टेलिव्हिजन Smart TVs Full HD रेज्युलेशनसह उपलब्ध आहे. तिन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये Xiaomi च्या Vivid Picture Engine इमेज प्रोसेसिंग टेकचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम कलर आणि कॉन्ट्रास्टचा अनुभव घेता येईल, असा दावा कंपनीनं केला आहे. 

ऑडिओसाठी ४० इंच आणि ४३ इंचाच्या टेलिव्हिजनमध्ये 24W स्पीकर सेटअप देण्यात आला आहे. तर ३२ इंचाच्या मॉडलमध्ये 20W चा स्पीकर देण्यात आला आहे. सर्व स्मार्ट टीव्हीमध्ये Dolby Audio, DTS-X आणि DTS-X Virtual सपोर्ट सिस्टम आहे. 

Android TV 11 out of the box बेस्ड Xiaomi चा Patchwall UI देण्यात आला आहे. यात IPL 2022 विजेट देखील देण्यात आळं आहे. यात यूजर्सला गुगल असिस्टंट, क्रोमकास्ट, गुगल प्ले स्टोअर आणि प्ले सर्व्हीसचा देखील सपोर्ट देण्यात आला आहे. 

४० आणि ४३ इंचाच्या टेलिव्हिजनमध्ये १.५ जीबी रॅम व 8GB स्टोरेज देण्यात आला आहे. हे टीव्ही क्वाडकोअर A55 CPU सह येतात. ३२ इंचाच्या मॉडलमध्ये 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज देण्यात आला आहे. यात Bluetooth 5.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच ड्युअल बँड WiFi सपोर्ट, इंटरनेट पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅकसपोर्ट देखील आहे. 

कंपनीनं आपल्या प्रिमियम Xiaomi OLED Vision टेलिव्हिजन देखील बाजारात दाखल केला आहे. या टेलिव्हिजनची किंमत भारतात ८९,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. बँक ऑफर्ससह हा टीव्ही तुम्हाला ८३,९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. 

टॅग्स :xiaomiशाओमीTelevisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान