किफायतशीर किंमतीत 120W फास्ट चार्जिंग देणार Xiaomi; ढासू फीचर्ससह येणार Redmi Note 11  

By सिद्धेश जाधव | Published: October 8, 2021 05:11 PM2021-10-08T17:11:20+5:302021-10-08T17:11:27+5:30

Android Phone Xiaomi Redmi Note 11 Specification: चिनी सोशल मीडिया साईट विबोवरून Xiaomi Redmi Note 11 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

Xiaomi redmi note 11 may get 120w fast charging support | किफायतशीर किंमतीत 120W फास्ट चार्जिंग देणार Xiaomi; ढासू फीचर्ससह येणार Redmi Note 11  

किफायतशीर किंमतीत 120W फास्ट चार्जिंग देणार Xiaomi; ढासू फीचर्ससह येणार Redmi Note 11  

Next

शाओमीची रेडमी नोट सीरिज कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षीच्या सुरुवातीला Redmi Note 10 सीरिज लाँच करण्यात आली होती. आता कंपनी Redmi Note 11 series वर काम करत आहे. गेले कित्येक दिवस या सीरिजच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती येत आहे, आता पुन्हा एकदा आगामी Redmi Note 11 series चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. 

Redmi Note 11 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स 

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने रेडमी नोट 11 सीरिजचे स्पेक्स लीक केले आहेत. हे स्पेसिफिकेशन्स चिनी सोशल मीडिया साईट विबोवर शेयर करण्यात आले आहेत. त्यानुसार Redmi Note 11 series मधील टॉप अँड मॉडेल 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. म्हणजे Note 11 Pro आणि 11 Pro Max स्मार्टफोनमध्ये ही फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.  

नुकत्याच लाँच झालेल्या Redmi Note 10 चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 10 Lite मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080x2400 रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह सादर करण्यात आला आहे. ज्याला गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-कोर चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल.    

नोट 10 लाईट अँड्रॉइड 10 वर आधारित एमआईयुआय 11 चालतो. कनेक्टिव्हीटीसाठी 4जी वीओएलटीई, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि आयआर ब्लास्टर असे फिचर मिळतात. सिक्योरिटीसाठी एआय फेस अनलॉक आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या चौथ्या सेन्सर असेल. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Note 10 Lite मधील 5,020mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.   

Web Title: Xiaomi redmi note 11 may get 120w fast charging support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.