शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Redmi चा अजून एक जबराट स्वस्त स्मार्टफोन आला बाजारात; असा आहे Redmi Note 11 4G 

By सिद्धेश जाधव | Updated: November 25, 2021 12:07 IST

Redmi Note 11 4G Launch and Price: शाओमीने आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत नवीन 4G फोन Redmi Note 11 नावानं लाँच केला आहे. ज्यात 90Hz Refresh Rate, 6GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP कॅमेरा आहे.

Redmi ने गेल्याच महिन्यात आपली ‘Note 11’ सीरीज चीनमध्ये सादर केली होती. कंपनीची नोट सीरिज स्वस्त स्मार्टफोनसाठी ओळखली जाते, परंतु यावेळी कंपनीनं फक्त 5G Phone लाँच केले होते. यामुळे अनेक शाओमी फॅन्सने नाराजी व्यक्त केली. पण आता कंपनीनं या सीरीजमध्ये एक 4G फोन देखील जोडला आहे. हा नवीन स्मार्टफोन Redmi Note 11 4G नावानं लाँच करण्यात आला आहे.  

Redmi Note 11 4G चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11 4G मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एलसीडी डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर माली जी52 जीपीयू मिळतो. 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह येणारा रेडमी फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.  

फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. Redmi Note 11 4G मधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये 3.5एमएम जॅक, आयआर ब्लास्टर आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या डिवाइसमधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग आणि 9वॉट रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.  

Redmi Note 11 4G ची किंमत 

Redmi Note 11 4G चे दोन रॅम व्हेरिएंट चीनमध्ये आले आहेत. यातील 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 युआन (सुमारे 11,600 रुपये) आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1099 युआन (सुमारे 12,800 रुपये) मोजावे लागतील. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान