शाओमीचे नवीन मी नोटबुक प्रो दाखल

By शेखर पाटील | Published: August 27, 2018 03:25 PM2018-08-27T15:25:41+5:302018-08-27T15:26:39+5:30

शाओमीने आपल्या नवीन मी नोटबुक प्रो या लॅपटॉपला बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

xiaomi mi notebook pro new in market | शाओमीचे नवीन मी नोटबुक प्रो दाखल

शाओमीचे नवीन मी नोटबुक प्रो दाखल

Next

शाओमीने आपल्या नवीन मी नोटबुक प्रो या लॅपटॉपला बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

शाओमीने आधीच मी नोटबुक प्रो हे मॉडेल बाजारपेठेत उतारले आहे. आता याचीच नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. अर्थात हे दुसर्‍या पिढीतील मॉडेल असणार आहे. यात आधीच्या मॉडेलपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आठव्या पिढीतील इंटेलचे कोअर आय-५ आणि आय-७ या प्रोसेसर्सचा पर्याय देण्यात आलेला आहे. अर्थात, याच्या विविध व्हेरियंटमध्ये हे भिन्न प्रोसेसर दिलेले असतील. यात रॅमसाठी ४ आणि ८ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तर स्टोअरेजसाठी यामध्ये १२८ जीबी ते १ टिबी असे विविध पर्याय देण्यात आले आहेत. यात एनव्हिडीयाचा  जीफोर्स एमएक्स ११० हा ग्राफीक प्रोसेसर दिलेला आहे. यामुळे याच्या डिस्प्लेवर अतिशय उच्च दर्जाच्या ग्राफीक्सचा आनंद घेता येणार आहे. यात अतिशय दर्जेदार कुलींग सिस्टीमही दिलेली आहे. यात दोन फॅन आणि हिटींग पाईटचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे हा लॅपटॉप दीर्घ काळापर्यंत वापरूनही तो तापणार नसल्याचे शाओमी कंपनीने नमूद केले आहे. यातील किबोर्डदेखील अतिशय उत्तम दर्जाचा असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

मी नोटबुक प्रो या मॉडेलच्या नवीन आवृत्तीमध्ये दोन युएसबी २.०, तीन युएसबी ३.० तर प्रत्येकी एक एचडीएमआय, एसडी कार्ड स्लॉट आणि इथरनेट पोर्ट देण्यात आले आहेत. यात ऑडिओ जॅकचाही समावेश असणार आहे. तसेच यात ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायचाही सपोर्ट असणार आहे. यामध्ये प्रत्येकी ३ वॅट क्षमतेचे दोन स्पीकर देण्यात आलेले आहेत. यात डॉल्बीच्या सराऊंड साऊंड या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे यावर अतिशय दर्जेदार श्रवणानुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. पहिल्यांदा हे मॉडेल्स चीनमध्ये उपलब्ध करण्यात आले असून लवकरच याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार आहे.

Web Title: xiaomi mi notebook pro new in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.