शाओमी ग्राहकांना झटका!  एक दोन नव्हे तर अर्धा डझन बजेट Redmi स्मार्टफोन्स महागले 

By सिद्धेश जाधव | Published: September 4, 2021 01:20 PM2021-09-04T13:20:33+5:302021-09-04T13:20:52+5:30

Redmi Smartphones Price hike: Xiaomi ने आपल्या 6 रेडमी स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. यात Redmi 9, Redmi 9 Power, Redmi 9 Prime, Redmi 9i, Redmi Note 10T 5G, आणि Redmi Note 10S चा समावेश आहे.  

Xiaomi increased price of 6 redmi smartphones  | शाओमी ग्राहकांना झटका!  एक दोन नव्हे तर अर्धा डझन बजेट Redmi स्मार्टफोन्स महागले 

शाओमी ग्राहकांना झटका!  एक दोन नव्हे तर अर्धा डझन बजेट Redmi स्मार्टफोन्स महागले 

Next

स्मार्टफोन ग्राहकांना एकामागून एक स्मार्टफोन कंपन्या झटके देत आहेत. शाओमी, रियलमी, ओपो आणि सॅमसंगने आपल्या स्मार्टफोनच्या किंमती गेल्या काही दिवसांत वाढवल्या आहेत. आज आपण गेल्या काही दिवसांत किंमत वाढलेल्या Redmi स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत. Xiaomi चे Redmi 9, Redmi 9 Power, Redmi 9 Prime, Redmi 9i, Redmi Note 10T 5G, आणि Redmi Note 10S हे स्मार्टफोन गेल्या काही दिवसांत महागले आहेत.  

साधारणतः स्मार्टफोन कंपन्या जुन्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करतात. जेणेकरून त्याजागी येणाऱ्या नव्या स्मार्टफोनची मागणी वाढावी. परंतु सध्या भारतीय बाजारात उलटेच चित्र दिसत आहे. कंपन्यांनी या दरवाढीच्या मागचे कोणतेही कारण अधिकृतपणे सांगितलेले नाही. शाओमीने ज्या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे त्यातील जास्तीत जास्त स्मार्टफोन बेस मॉडेल्स आहेत. कंपनीने या स्मार्टफोन्सच्या किंमतीत 300 ते 500 रुपयांची वाढ केली आहे. चला जाणून घेऊया या सर्व स्मार्टफोनची नवीन किंमत. 

स्मार्टफोन मॉडेलजुनी किंमतझालेली वाढ नवीन किंमत  
Redmi 9 4GB + 64GB8,9995009,499
Redmi 9 Power 4GB + 64GB10,99950011,499
Redmi 9 Prime 4GB + 64GB9,99950010,499
Redmi 9i 4GB + 64GB8,4993008,799
Redmi Note 10T 5G 4GB + 64GB14,49950014,999

Redmi Note 10T 5G 6GB + 128GB

16,49950016,999
Redmi Note 10S 6GB + 128GB15,99950016,499


 

Web Title: Xiaomi increased price of 6 redmi smartphones 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.