शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅगशिप सेगमेंटमधील युद्धाला सुरुवात होणार; Xiaomi 12 Pro ची भारतीय किंमत आली समोर

By सिद्धेश जाधव | Updated: April 7, 2022 19:46 IST

Xiaomi 12 Pro स्मार्टफोन भारतात 12 एप्रिलला लाँच केला जाणार आहे. आता या फोनची किंमत समोर आली आहे.  

Xiaomi 12 Pro स्मार्टफोन भारतात येत्या 12 एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती याआधी आली आहे. या फोनसाठी अ‍ॅमेझॉनवर मायक्रोसाईट देखील लाईव्ह करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील लाँचमुळे या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती तर आहे परंतु किंमत मात्र समजली नाही. आता टिपस्टर योगेश ब्रारनं Xiaomi 12 Pro च्या भारतीय किंमतीची माहिती दिली आहे.  

Xiaomi 12 Pro ची संभाव्य किंमत  

लीक माहितीनुसार, तो Xiaomi 12 Pro फोनची किंमत 65,000 रुपयांपासून सुरु होतील. तसेच कंपनी Xiaomi 12 आणि Xiaomi 12X स्मार्टफोन्स देखील भारतात सादर करू शकते. हे तिन्ही स्मार्टफोन्स याआधी जागतिक बाजारात लाँच झाले आहेत. भारतात Xiaomi 12X स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि Xiaomi 12X Pro स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह लाँच केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. हे तिन्ही फोन्स फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालू शकतात.  

Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

शाओमी 12 प्रो स्मार्टफोनमधील डिस्प्ले देखील शानदार आहे. यात 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा ई5 अ‍ॅमोलेड एलटीपीओ पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. हा फोन 10बिट कलर आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.  

Xiaomi 12 Pro लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित नव्या कोऱ्या मीयुआय 13 वर चालतो. 3 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसरसह 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट या शाओमी 12 प्रो चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. हा फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.  

पावर बॅकअपसाठी Xiaomi 12 Pro मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यातील 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला हा फोन मिनिटांत फुल चार्ज करेल. हा फोन फक्त 15 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हा डिवाइस 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.  

फोटोग्राफीसाठी शाओमी 12 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स707 7पी लेन्स मुख्य सेन्सरचे काम करते. सोबत 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान