शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

WWDC 2023: iPhone झाला जुना! Apple ने लाँच केला Vision Pro ऑग्मेंटेड रिअलिटी हेडसेट, पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 12:49 IST

पाहा काय आहे खास, यामुळे स्मार्टफोनचा वापर कमी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

सध्या आपण अनेक कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून आहोत. परंतु तंत्रज्ञान सातत्यानं बदलत असतं. असाच एक बदल आता पुन्हा होताना दिसतोय. आता अ‍ॅपलनं आपला VR हेडसेट Vison Pro लाँच केलाय. याच्यामुळे स्मार्टफोनचा वापर कमी होऊ शकतो अशा शक्यता वर्तवण्यात येतायत.

सद्यस्थितीत आपण शॉपिंगपासून फिल्म्स पाहण्यापर्यंत किंवा व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनचाच वापर करतो. परंतु येणाऱ्या काळात व्हिडीओ कॉलिंग, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग आणि व्हर्चुअल मीटिंगसह चित्रपट पाहण्यासाठीही VR हेडसेटचा वापर केला जाईल.

काय आहे Apple Vison Pro?हा एक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट आहे. हा तुमच्या चष्म्याप्रमाणे असतो आणि तुम्ही सहजरित्या त्याचा वापर करू शकता. यामध्ये एका डिस्प्लेसोबतच अनेक सेन्सर्सचा वापर केला आहे. यासोबत त्यात कॅमेरा, स्पीकर आणि चिपसेटचा वापर केला जातो. यामुळेच तो एका स्मार्टफोन प्रमाणे काम करण्यास सक्षम आहे. स्मार्टफोनमध्ये होणारी बहुतांश कामं याद्वारे केली जातात.

Apple Vision Pro नव्या युगाची सुरुवातदरम्यान, अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी व्हिजन प्रो हेडसेट लाँच करताना ही नव्या युगाची सुरूवात असल्याचं म्हटलं. हा एक नव्या प्रकारचा कम्प्युटर आहे, जो युझरला रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल स्पेसला मर्जची सुविधा देणार असल्याचंही त्यांनी WWDC 2023 मध्ये सांगितलं.

काय आहे खास?याचा वापर करताना युझरला व्हर्च्युअल जगतासह सामान्य कामंही करता येऊ शकतात. हे एक अतिशय शक्तिशाली एंटरटेंनमेंट आणि कम्युनिकेशन टुल असेल. यासोबतच तुम्ही शॉपिंगही करू शकाल. यात व्हर्च्युअल रुममध्ये व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा असेल. दरम्यान, हा सामान्य व्हीआर हेडसेटपेक्षा निराळा असेल असं अ‍ॅपलनं नमूद केलंय.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?Apple Vision Pro मध्ये कर्व्ह्ड ग्लासचा वापर करण्यात आलाय. यामध्ये अ‍ॅपलच्या हार्डवेअरचा वापर करण्यात आलाय. याशिवाय यात R1 सिलिकॉन चिपचा वापर केला असून या डिव्हाइसचा बॅटरी बॅकअप २ तासांचा आहे. यात ऑप्टीकल आयडीचा वापर करण्यात आलाय. याद्वारे युझरच्या रॅटिनाला स्कॅन करून डिव्हाईस अनलॉक होणार आहे. यात visionOS चा वापर करण्यात आलाय.

किंमत किती?अ‍ॅपल व्हिजन प्रो सध्या विक्रीसाठी उपलब्ध नाही. पुढील वर्षी हा व्हीआर हेडसेट विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. याची किंमत ३९९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास २.८८ लाख आहे.

टॅग्स :Apple Incअॅपल