Power Bank: भारीच! आली जगातील पहिली 100W चार्जिंग स्पीड आलेली पॉवरबँक; मिनिटांत फुल चार्ज होईल फोन
By सिद्धेश जाधव | Updated: December 15, 2021 20:02 IST2021-12-15T20:02:31+5:302021-12-15T20:02:56+5:30
Power Bank: जगातील पहिली 100W फास्ट चार्जिंग असलेली पॉवरबँक लाँच झाली आहे. यामुळे फक्त काही मिनिटांत फोन चार्ज करता येईल.

Power Bank: भारीच! आली जगातील पहिली 100W चार्जिंग स्पीड आलेली पॉवरबँक; मिनिटांत फुल चार्ज होईल फोन
Power Bank: पॉवरबँकचा वापर प्रवासात सर्वाधिक केला जातो. बॅकअपचा काम करणारा हा डिवाइस फोन फुल चार्ज करण्यासाठी मात्र खूप वेळ घेतो. यावर देखील आता पर्याय आला आहे. जगातील पहिली 100W फास्ट चार्जिंग स्पीड असलेली पॉवरबँक लाँच झाली आहे. युजर्स हीच वापर करून काही मिनिटांत फोन चार्ज सक करू शकतील.
फीचर्स
PhoneArena च्या रिपोर्टनुसार , Elecjet कंपनीच्या Apollo Ultra या पॉवरबँकची क्षमता 10,000mAh आहे. यात ग्रॅफाइट बॅटरीचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे बॅटरी 100W चा आऊटपुट देऊ शकते. या पॉवरबँकचे वजन फक्त 230 ग्राम असेल. फास्ट चार्जिंगमध्ये तापमान खूप वाढण्याची शक्यता असते. परंतु ही पॉवरबँक 43 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम होत नाही त्यामुळे हीच वापर सुरक्षित ठरतो.
Elecjet कंपनीच्या पॉवरबँकचा वापर करून फक्त 27 मिनिटांत फुल चार्ज करू शकते. तसेच हीच वर रोज केल्यास ही बॅटरी 2,500 चार्जिंग सायकल देते. म्हणजे या पॉवरबँक 2,500 वेळा चार्ज आणि डिस्चार्ज करता येईल. या सुपरफास्ट पॉवरबँक (Power bank) मध्ये एक छोटा डिस्प्ले देखील मिळतो. हा डिस्प्ले उपलब्ध बॅटरी टक्के डिस्प्ले करतो. तसेच यात अनेक पोर्ट मिळतात, त्यामुळे एकाच वेळी साथ अनेक डिवाइसेज चार्ज करता येतात.
किंमत
ही पॉवरबँक Indeigogo कँपेनच्या माध्यमातून विकली जात आहे. अजून काही दिवस ही कँपेन सुरु राहील. या कँपेन अंतगर्त ही पॉवरबँक $69 डॉलर (जवळपास 5,200 रुपये) मध्ये विकत घेता येईल. याची मूळ किंमत 100 डॉलर्स (जवळपास 7,630 रुपये) आहे.