पाऊणे चार लाख फोटो साठवून ठेवता येणार; आलं जगातील सर्वात जास्त मेमरी असलेलं microSD कार्ड 

By सिद्धेश जाधव | Published: June 23, 2022 03:09 PM2022-06-23T15:09:45+5:302022-06-23T15:10:07+5:30

Micron या कंपनीनं Embedded World 2022 Conference दरम्यान जगातील सर्वात जास्त स्टोरेज microSD कार्ड i400 सादर केलं आहे.

World highest capacity microsd micron i400 launched during Embedded World 2022 Conference   | पाऊणे चार लाख फोटो साठवून ठेवता येणार; आलं जगातील सर्वात जास्त मेमरी असलेलं microSD कार्ड 

पाऊणे चार लाख फोटो साठवून ठेवता येणार; आलं जगातील सर्वात जास्त मेमरी असलेलं microSD कार्ड 

googlenewsNext

दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी जास्त प्रगती करत आहे, गॅजेट्स कॉम्पॅक्ट होत आहेत. एक काळ होता जेव्हा 1TB  स्टोरेजसाठी तळहाताच्या आकाराइतकी हार्ड ड्राइव्ह सोबत बाळगावी लागायची. काही वर्षांपूर्वी सॅनडिस्क कंपनीनं 1TB स्टोरेज असलेला मायक्रोएसडी कार्ड सादर केलं होत. त्यामुळे एक टीबी डेटा आता बोटाच्या पेराच्या आकारात माऊ लागला. आता Micron नं Embedded World 2022 Conference मधून जगातील सर्वात जास्त स्टोरेज असलेला microSD कार्ड i400 सादर केलं आहे. या कार्डमध्ये 1.5TB स्टोरेज मिळते.  

जगातील सर्वात जास्त स्टोरेज असलेल्या या कार्डची जास्त माहिती समोर आली नाही. यात Micron च्या या 1.5TB स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या परफॉर्मन्सची माहिती देखील समोर आली नाही. या कार्डचा रीड अँड राईट स्पीड किती असेल हे देखील सांगण्यात आलं नाही. तसेच हे कार्ड सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार नाही तर फक्त एंटरप्राइज मार्केटसाठी सादर करण्यात आलं आहे. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की हे एक इंडस्ट्री-ग्रेड प्रोडक्ट असेल.  

किती डेटा राहील यात 

1.5TB microSD कार्डमध्ये 5 वर्षापर्यंतची 24×7 हाय-क्वॉलिटी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठवून ठेवता येईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डचा वापर डॅश कॅम, होम सिक्योरिटी सॉल्यूशन, पोलिसांचे बॉडी कॅमेरा इत्यादी डिवाइसमध्ये मोठ्याप्रमाणावर होऊ शकतो. या कार्डमध्ये 3,75,000 फोटोज, 350 DVDs, 70 Blu-rays किंवा 15,000 Zip disks सहज साठवून ठेवले जाऊ शकतात.  

किंमत  

कंपनीनं Micron i400 microSD कार्डची किंमत आणि उपलब्धतेची माहिती सांगितलेली नाही. मात्र SanDisk नं 2019 मध्ये सर्वात आधी सादर केलेलं 1TB microSD कार्ड सध्या 450 डॉलर्स (35,225 रुपये) मध्ये विकलं जात आहे.  

Web Title: World highest capacity microsd micron i400 launched during Embedded World 2022 Conference  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.