धोक्याची घंटा? ChatGPT मुळे महिलेने गमावली नोकरी; काम मिळत नाही, 3 महिन्यांपासून बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:18 AM2023-07-22T10:18:43+5:302023-07-22T10:19:47+5:30

एका महिलेने ChatGPT हे तिची नोकरी जाण्यामागतं कारण आहे असं म्हटलं आहे. परंतु असं म्हणणारी ती एकटी नाही. यामुळे अनेकांनी नोकरी गमावली आहे.

woman lost her job to chatgpt ai out of work for 3 months | धोक्याची घंटा? ChatGPT मुळे महिलेने गमावली नोकरी; काम मिळत नाही, 3 महिन्यांपासून बेरोजगार

धोक्याची घंटा? ChatGPT मुळे महिलेने गमावली नोकरी; काम मिळत नाही, 3 महिन्यांपासून बेरोजगार

googlenewsNext

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधीपासूनच सुरू आहे, पण या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याची चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात सर्वात मोठी भीती नोकरी जाण्याची आहे. सोशल मीडिया असो किंवा कोणतीही सर्वसाधारण सभा असो, लोक एआयमुळे बेरोजगार झाल्याची चर्चा करताना दिसतात. काही लोकांच्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. 

अलीकडेच एका महिलेने ChatGPT हे तिची नोकरी जाण्यामागतं कारण आहे असं म्हटलं आहे. परंतु असं म्हणणारी ती एकटी नाही. यामुळे अनेकांनी नोकरी गमावली आहे. महिलेने सांगितले की, ती एक कॉपी रायटर आणि स्टँड-अप कॉमेडियन आहे. ती फ्रीलांसर म्हणून कंटेंट रायटिंग करायची, पण एआयने तिचे काम हिरावून घेतले गेले. तिने सांगितलं की, सुरुवातीला काम कमी होऊ लागले. कमी कामं मिळू लागली त्यानंतर तिला स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ लागली.

महिलेला कमी काम मिळण्यामागचे कारण म्हणजे AI पॉवर्ड ChatGPT. कारण क्लायंट कॉस्ट कटिंगसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. त्याचे बहुतेक क्लायंट छोटे व्यवसायिक, स्टार्टअप आणि नवीन ब्रँड होते. या सर्वांनी हळूहळू एआयची मदत घेण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे तिच्याकडे आता काम नाही. तिने अनेक मुलाखती दिल्या, पण कुठेही यश मिळाले नाही. यामुळे ती खूप महिन्यांपासून बेरोजगार आहे. ChatGPT मुळे नोकरी गमावलेल्या लोकांची यादी मोठी आहे. 

सोशल मीडियावर अनेकांनी याबद्दल लिहिलं आहे. ओपन एआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ChatGPT लाँच केले होते. लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांतच त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली. काही वेळातच, 10 कोटींहून अधिक युजर्स त्यावर पोहोचले. गुगलला घाईघाईत आपला एआय बॉट बार्ड लॉन्च करायचा होता. परंतु ओपनएआयच्या चॅटजीपीटीला जेवढी लोकप्रियता मिळाली आहे तेवढी लोकप्रियता अद्याप गुगल बार्डला मिळालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: woman lost her job to chatgpt ai out of work for 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.