शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अ‍ॅक्टर रोबो मराठीत बोलणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:49 IST

मुंबईकरांना उत्सुकता : ३० हून अधिक भाषा येणारा थेस्पियन आयआयटी टेकफेस्टमध्ये होणार सहभागी

मुंबई : अनेकदा हॉस्पिटल्स, हॉटेल्स, एअरपोर्ट वा मोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटमार्फत अनेक कामे पार पाडली जातात. मात्र आता अभिनयातून मनोरंजन करणारा रोबोही मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये हा रोबो थेस्पियन सहभागी होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो ३० हून अधिक भाषा बोलू शकतो. शिवाय ७० हून अधिक आवाज काढू शकतो. त्यामुळे तो मराठीतही बोलणार का? अशी उत्सुकता आहे.

‘तंत्रज्ञानाचा कुंभमेळा’ अशी ओळख असलेल्या आयआयटी टेकफेस्टमध्ये रोबो थेस्पिअनला आमंत्रित केले आहे. जगभरात अनेक इव्हेंट्स करणारा हा रोबो पहिल्यांदाच भारतात येणार आहे. ‘जगातील पहिला अ‍ॅक्टर आणि परफॉर्मर’ अशी त्याची ओळख आहे. ५ फूट ९ इंच उंच आणि ३३ किलो वजनाच्या रोबोच्या काही हालचाली या एअर मसल्स व सर्वो मोटरच्या साहाय्याने नियंत्रित केल्या जातात. मानवी हालचालींसारखाच वावर असणारा हा रोबो समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? तिचे वय आणि चेहऱ्यावरील हावभाव सहज ओळखू शकतो.यंदा ३ ते ५ जानेवारीदरम्यान इव्हेंट होणारह्युमनॉइड सोफिया हा रोबो मागच्या वर्षी टेकफेस्टमध्येसहभागी झाला होता, तेव्हा ‘नमस्ते इंडिया’ म्हणून सोफियाने मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. यंदा ३ ते ५ जानेवारी या काळात हा इव्हेंट होत आहे.

गर्दीतील चेहरेही सहजरीत्या ओळखण्यात पारंगततितक्याच सहजरीत्या- रोबो थेस्पिअन हा ह्युमनॉइड आहे. त्याच्या शारीरिक हालचालींसोबतची एलईडी लाईट व एलसीडी डोळ्यांमधून शब्दांसोबत व्यक्त होणाºया भावना समोरच्या व्यक्तीला मंत्रमुग्ध करणाºया आहेत.दिलेल्या स्क्रिप्टप्रमाणे डायलॉग डिलिव्हरी करून त्यात एक्स्प्रेशन्स देणे, सोबतच डान्स करणे, उत्तमरीत्या गाणे अशा कलांनी परिपूर्ण असल्याने थेस्पिअन उत्तम कलाकार आणि अभिनेता म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.त्याच्यातील मोशन कॅप्चर सॉफ्टवेअरमुळे तो एखाद्याची हुबेहूब नक्कल करू शकतो; सोबतच गर्दीतील चेहरेही तितक्याच सहजरीत्या ओळखू शकतो.