शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या नावाचं सीम कार्ड कोण वापरतंय?; सुरक्षेसाठी जाणून घ्या, असं चेक करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:52 IST

स्कॅमर्स किंवा गुन्हेगार कुणा दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करतात.

मुंबई - डिजिटल इंडियात आणि स्मार्टफोनच्या जमान्यात सीम कार्ड ही प्रत्येकाची गरज आहे. कारण, प्रत्येक हाती मोबाईल आल्याने सीम कार्ड घेतल्याशिवाय तुमचा मोबाईल सुरुच होऊ शकत नाही. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (TRAI) ने सीम कार्डच्या अनुषंगाने एक नियम बदलला आहे. त्यानुसार, सीम कार्ड स्वॅप केल्यानंतर त्याच सीम कार्डला ७ दिवसांपर्यंत दुसऱ्या कंपनीत पोर्ट केले जाऊ शकत नाही. १ जुलैपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. दरम्यान, तुमच्या नावावरही एकपेक्षा जास्त सीम असू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या नावार किती सीम कार्ड आहेत. 

स्कॅमर्स किंवा गुन्हेगार कुणा दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करतात. देशविरोधी कारवाई किंवा सायबर फ्रॉडसाठीही या सीम कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे, तुमच्या नावाचे सीम कार्ड कोण वापरतंय का, हेही खात्री करुन घ्यायला हवी. तुम्हाला तुमच्या सीम कार्डचा वापर कोण करतंय हे जाणून घेण्यासाठीची आवश्यक ती माहिती या लेखातून मिळेल. तुमच्या आधार कार्डचा वापर करुन किती सीम कार्ड वापरले जात आहेत, हे तुम्हाला सहजपणे कळू शकेल. 

संचार साथी पोर्टरवर जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता. (tafcop.sancharsaathi.gov.in) 

tafcop.sancharsaathi.gov.in किंवा sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जाऊन Citizen Centric Services बटणावर क्लीक करा.  त्यानंतर, Know Your mobile connection यावर क्लीक करा. इथून तुम्हाला मोबाईल कनेक्शन संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल. येथे तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाईल क्रमांक एंटर करावा लागेल. त्यानंतर, तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर मोबाईल क्रमांकाची डिटेल्स येईल. त्यानुसार, तुमच्या नावावर किती सीम कार्ड सुरू आहेत, ते तुम्ही पाहू शकता. 

दरम्यान, या माहितीतून तुम्ही वापरत नसलेल्या किंवा तुम्ही सध्या वापरत नसलेला तुमचा मोबाईल नंबर सुरू असल्यास तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता. त्यानंतर, तो मोबाईल क्रमांक बंद करू शकता.

टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम