शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

डेटा चोरीबद्दल खडान्-खडा माहिती असलेला 'हा' एलियट अॅल्डरसन आहे तरी कोण?

By वैभव देसाई | Published: March 30, 2018 4:47 PM

एलियट अॅल्डरसन या ट्विटर हँडलरवरून या सर्व माहितीची पोलखोल करण्यात आली असून, ते अकाऊंट फ्रेंच सुरक्षा संशोधक रॉबर्ट बॅप्टिस्टे हाताळतात. रॉबर्ट बॅप्टिस्टे पेशानं नेटवर्क आणि टेलिकम्युनिकेशन अभियंते आहेत.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारकडून नागरिकांचा खासगी डेटा सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत असलं तरी फ्रेंच सुरक्षा संशोधक रॉबर्ट बॅप्टिस्टे यांनी भारतीयांचा डेटा कोणीही हॅक करू शकतं, असा दावा केला आहे. एलियट अॅल्डरसन या ट्विटर हँडलरवरून या सर्व माहितीची पोलखोल करण्यात आली असून, ते अकाऊंट फ्रेंच सुरक्षा संशोधक रॉबर्ट बॅप्टिस्टे हाताळतात. रॉबर्ट बॅप्टिस्टे पेशानं नेटवर्क आणि टेलिकम्युनिकेशन अभियंते आहेत.२८ वर्षीय सायबर सुरक्षातज्ज्ञ रॉबर्ट बॅप्टिस्टे हे एकटेच एका सैन्यासारखे आहेत. त्यांना कोणतीही टीम मदत करत नाही. गेल्या वर्षी अँड्रॉइड पिट या टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेल्या वेबसाइटनं त्यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर स्क्रोल.इन या वेबसाइटनंही रॉबर्ट बॅप्टिस्टे हे पेशानं नेटवर्क आणि टेलिकम्युनिकेशन अभियंते असून, स्वतंत्रपणे काम करणारे अँड्रॉइड डेव्हलपर असल्याची माहिती उघड केली होती. त्यांची ट्विटरवरची प्रोफाइल पाहिल्यास ते अमेरिकन टीव्ही मालिकेतील काल्पनिक पात्र असलेल्या मिस्टर रोबोटपासून प्रेरित झाल्याची प्रचिती येते.एलियट अॅल्डरसन नावाचं ट्विटर हँडल हाताळणारे रॉबर्ट हे श्रीमंत तर आहेतच, परंतु स्वतःच्या हॅकिंगच्या कलेमुळे समाजात बदनामही आहेत. मात्र एका प्रकाशनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला आहे की, मी अमेरिकन टीव्ही मालिकेतील काल्पनिक पात्र असलेल्या मिस्टर रोबोटपासून प्रेरणा घेतलेली नाही, तर अमेरिकन सायबर तज्ज्ञ एडवर्ड स्नोडेन यांना आपला आदर्श मानतो. त्यांच्यामुळेच मला या विषयात सखोल संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळालं असून, तंत्रज्ञानाच्या सुरक्षेवरून निर्माण होणाऱ्या वादावर काम करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.रॉबर्ट बॅप्टिस्टे यांच्या मते, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (युआयडीएआय)सह काँग्रेस अॅप आणि नमो अॅप सुरक्षित नाहीत. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सायबर सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरणार तर नाही ना, याची चिंता त्यांना सतावते आहे. केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश राजकीय विश्लेषक कंपनीनं फेसबुकद्वारे ५ कोटी भारतीय लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवली आहे. तर ब्रेक्झिट आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेटा चोरी करून त्याचा वापर करण्यात आल्याचा दावा रॉबर्ट यांनी केला आहे. मतदारांची खासगी माहिती चोरी होणं हे लोकशाहीसाठी खूपच घातक आहे, असं रॉबर्ट म्हणाले आहेत.

  • नमो अॅप

‘नमो ॲप’ वापरणाऱ्या युजर्झची माहिती थर्ड पार्टीच्या माध्यमातून अमेरिकेतील ‘क्लेवर टॅप’ या कंपनीला दिली जात असल्याचा मुद्दाही बॅप्टिस्टे यांनी अधोरेखित केला आहे. नमो अॅप नागरिकांची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अमेरिकेतल्या केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला देत असल्याचा दावाही रॉबर्ट यांनी केला आहे.

  • काँग्रेसच्या अॅपवरूनही राजकीय वाद

नमो अॅपच नव्हे, तर काँग्रेसचं अॅपही वापरकर्त्यांचा डेटा चोरतं. काँग्रेसचं अॅप वापरकर्त्यांची माहिती स्वतःच्या अधिकृत वेबसाइटवर दाखवत असल्याचंही रॉबर्ट यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षाकडून प्ले स्टोअरमधून त्यांच्या पक्षाचे INC India हे अधिकृत अॅप्लिकेशन हटवण्यातही आलं आहे. 

  • पेटीएमही असुरक्षित 

पेटीएम कशा प्रकारे युझर्सचा डेटा मिळवते हेसुद्धा रॉबर्ट बॅप्टिस्टे यांनी उघड केलं होतं. पेटीएमचं अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर रुट एक्सेसची परवानगी मागितली जाते. रुट एक्सेस हे अँड्रॉइड अॅपच्या माध्यमातून आपल्या फोनमध्ये घुसण्याचं महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यामुळे एकदा का तुम्ही रुट एक्सेसला परवानगी दिली, तर तुमच्या दुसऱ्या अॅपमधील डेटाही पेटीएम चोरू शकतं. अँड्रॉइड यंत्रणेत अशा चोऱ्या रोखण्याची कोणतीही सुरक्षा उपलब्ध नसल्याचंही रॉबर्ट बॅप्टिस्टे यांनी सांगितलं आहे. पेटीएम सीईओ विजय शेखर शर्मा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून रुट एक्सेस करताना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला होता. 

  • भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीही 'आधार'हीन

तुमच्या आधारचा डेटाही सुरक्षित नाही. १४ मार्च रोजी आंध्र प्रदेश सरकारच्या वेबसाइटवरून डेटा लीक झाला होता. त्यानंतर ट्विटरवर आंध्र प्रदेशच्या सरकारच्या वेबसाइटवरून डेटा लीक झाल्याचे स्क्रीन शॉटही टाकण्यात आले होते. त्यामुळे तुमचं आधारही सुरक्षित नसल्याचं रॉबर्ट बॅप्टिस्टे म्हणाले आहेत. तीन तासांत भारतातल्या २० हजारांहून अधिक लोकांच्या आधारची माहिती वेगवेगळ्या वेबसाइटवरून मिळल्याचा दावाही रॉबर्ट यांनी केला आहे. 

  • भारतीय टपाल, इस्रो आणि बीएसएनएलही असुरक्षित

गेल्या काही दिवसांपूर्वी हॅकर्सनं बीएसएनएलचाही डेटा हॅक केला होता. तसेच भारतीय टपाल खात्याचं अंतर्गत सर्व्हरही हॅक करण्यात आलं होतं. बीएसएनएल हे सॅटलाइट ट्रॅकिंग युनिटवर चालत असूनही ते हॅक होऊ शकतं. मग इस्रो आणि टपाल खातं तरी सुरक्षित कशावरून, असा प्रश्नही रॉबर्ट बॅप्टिस्टे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Cambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका