शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं कुठलं मूल आहे ‘पासवर्ड चाइल्ड’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 08:44 IST

मेल बॉक्स ओपन करताना, ऑनलाइन पैसे हस्तांतरित करताना, अगदी मोबाइल सुरू करतानाही हल्ली पासवर्ड लागतो. त्यामुळे सहज लक्षात राहील, असा पासवर्ड शक्यतो ठेवला जातो.

- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबईतसं पहायला गेलं तर प्रत्येक आई-बापाला आपली सर्व मुलं प्यारी असतात. त्यांच्यावर ते एकसमान प्रेम करतात. कोणतंही डावं-उजवं केलं जात नाही. तरीही सर्व मुलांमध्ये एक तरी लाडका वा लाडकी असतेच. आई-बापाला त्याचं-तिचं जरा जास्तच कौतुक असतं. शेंडेफळांच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते. मग या लाडक्या वा लाडकीची जन्मतारीख वा त्याच्या नावाची आद्याक्षरं किंवा त्याचं-तिचं टोपणनाव यांचा वापर कोणत्याही ठिकाणच्या पासवर्डसाठी सर्रास केला जातो. या प्रकाराला ‘पासवर्ड चाइल्ड’ असं संबोधलं जातं. 

मेल बॉक्स ओपन करताना, ऑनलाइन पैसे हस्तांतरित करताना, अगदी मोबाइल सुरू करतानाही हल्ली पासवर्ड लागतो. त्यामुळे सहज लक्षात राहील, असा पासवर्ड शक्यतो ठेवला जातो. कोणी काय पासवर्ड ठेवावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी अनेक जण आपल्या लेकराबाळांच्या नावाचा वा त्यांच्या जन्मतारखांचा पासवर्ड ठेवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. जे मूल सर्वात प्रिय असतं त्याच्या नावाचा वा जन्मदिनांकाचा वापर पासवर्डसाठी केला जातो. असा वापर  करताना प्रामुख्याने तो लक्षात राहील हीच सोय बघितली जाते. पण इथे सोयीपेक्षा सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा  असतो.  यंदाच्या मार्च महिन्यात ‘पासवर्ड चाइल्ड’ हा शब्द सर्वाधिक व्हायरल झाला. अजूनही या शब्दाची चलती असल्याने यंदाचा तो सर्वात चर्चेचा शब्द ठरला आहे.  

खरं तर पासवर्ड हा खासगी विषय असतो. आपले ऑनलाइन व्यवहार, पैशांची देवाणघेवाण, वैयक्तिक माहिती, महत्त्वाची कागदपत्रे यांचे डिजिटली जतन करायचे असेल तर त्या ठिकाणी पासवर्ड अतिशय ‘स्ट्राँग’ असावा लागतो. आपला पासवर्ड सहजपणे कोणीही भेदू शकेल, एवढाही तो तकलादू नसावा. म्हणूनच सायबर तज्ज्ञ आपल्या प्रियजनांच्या नावाने वा त्यांच्या जन्माक्षरांनी सुरुवात होणारे पासवर्ड शक्यतो टाळावेत, असा सल्ला देतात. आपले मुलांवर कितीही प्रेम असलं आणि त्यांचा कोणत्याही स्वरूपातला पासवर्ड सहज लक्षात ठेवण्यासारखा असला तरी आपली गोपनीयता अभेद्य ठेवण्यासाठी पासवर्ड चाइल्डचा वापर टाळावाच, असं तज्ज्ञांचं आग्रहाचं सांगणं आहे. आपल्या सुरक्षेसाठीच ते असतं, नाही का?