शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

सावधान! देशातील प्रत्येक तिसरं Driving Licence आहे फेक, 'असं' करा झटपट चेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 4:15 PM

Driving Licence : देशात सध्या ड्रायव्हिंग लायसन्समधील प्रत्येक तिसरे ड्रायव्हिंग लायसन्स फेक आहे.

नवी दिल्ली - कोणतीही व्यक्ती जर विना ड्रायव्हिंग लायसन्सने वाहन चालवत असेल तसेच तुम्हाला जर या गुन्ह्यात पकडले गेले तर 5 हजार रुपयाचा दंड द्यावा लागू शकतो. यासोबतच 3 महिन्यांच्या जेलची शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्याच पद्धतीने फेक ड्रायविंग लायसन्सने वाहन चालवल्यास कडक नियम आहेत. ज्यात दंड या सोबत शिक्षेची तरतूद आहे. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या व्हॅलिडिटीसंबंधी काही अडचण असल्यास या ठिकाणी सांगण्यात आलेल्या स्टेप्स द्वारे ड्रायव्हिंग लायसन्सची खरी माहिती समोर येईल. जाणून घ्या डिटेल्स.

प्रत्येक तिसरे ड्रायव्हिंग लायसन्स आहे फेक

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 2019 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, देशात सध्या ड्रायव्हिंग लायसन्समधील प्रत्येक तिसरे ड्रायव्हिंग लायसन्स फेक आहे. नवीन मोटर वाहन एक्ट संबंधी बोलताना सांगितले होते की, फेक ड्रायव्हिंग लायसन्स वर आळा घालता येईल. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण, आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं.

फेक लायसन्समुळे रस्ते अपघातात वाढ

NCRB च्या आकडेवारीनुसार, देशात प्रत्येक वर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्ते परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, जास्तीत जास्त अपघात हे अनट्रेड ड्रायव्हरमुळे होतात. हे लोक फेक लायसन्स द्वारे वाहन चालवायला सुरुवात करतात.

फेक ड्रायव्हिंग लायसन्स असं ओळखा

- सर्वात आधी तुम्हाला https://parivahan.gov.in/parivahan/# वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.- या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करावे लागेल.- तुम्हाला Driving licence रिलेटेड सर्विसचा ऑप्शन दिसेल.- तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या समोर सिलेक्ट स्टेटचे ऑप्शन निवडू शकता.- तुमच्या समोर एक वेगळी विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुमच्या समोर ड्रायव्हिंग लायसन्सचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यास Service on DL चे ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.-  तुमच्या समोर कंटिन्यूचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्लिक करावे लागेल. त्यानंतर आणखी एक वेगळी विंडो ओपन होईल.- ज्यात तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि जन्म दिनांक आणि आपल्या राज्याची पुन्हा निवड करून त्यावर क्लिक करावे लागेल.- ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही ओके केल्यानंतर पुन्हा ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल्स समोर येईल. जर ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल्स समोर आली नाही तर समजून जा की, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स फेक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.