शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

महत्वाची बातमी! तुमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअ‍ॅप लवकरच बंद होऊ शकते, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 3:50 PM

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपचे आगामी फिचर आर्काइव्ह चॅटचे व्हर्जन लवकरच येणार आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप काही यूआय (यूजर इंटरफेस) वरही काम करत आहे, ज्यामुळे युजर्संना आर्काइव्ह चॅटमध्ये पाहता येणार आहे.

नवी दिल्ली : फेसबुकचे (Facebook) मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) काही फोनसाठी सपोर्ट बंद करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप बीटाचे 2.21.50 व्हर्जन iOS 9  आणि त्यापूर्वीचे सपोर्ट करणाऱ्या डिव्हाईसला आता सपोर्ट करणार नाही. (whatsapp will stop support on ios 9 or older device know details and upcoming features)

व्हॉट्सअ‍ॅपने सध्या आपल्या FAQ पेजला अपडेट केले नाही. मात्र एकदा हे व्हर्जन सार्वजनिक झाल्यानंतर ते अपडेट केले जाईल अशी आशा व्यक्त केली जात  आहे. याचा अर्थ असा की, iPhone 4 आणि iPhone 4s फोनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही.

सध्या iPhone 5 हा शेवटचा आयफोन आहे, ज्यावर व्हॉट्सअ‍ॅप कार्यरत आहे, आयफोन 5 ला 10.3 पर्यंत अपडेट मिळाले आहे. अँड्रॉईड युजर्संसाठी व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन 4.0.3 आणि त्यानंतरच्या अँड्रॉईडवर चालणार्‍या स्मार्टफोनला सपोर्ट करते. 

अखेरीस iOS आणि अँड्रॉईड व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप KaiOS वर सुद्धा काम करत आहे, जे जिओ फोन आणि जिओ फोन 2 सारख्या फिचर फोनवर काम करते. याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅपचे आगामी फिचर आर्काइव्ह चॅटचे उत्तम व्हर्जन लवकरच येणार आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, हे फिचर सध्या डेव्हलपमेंट टप्प्यावर आहे. 

तसेच, व्हॉट्सअ‍ॅप काही यूआय (यूजर इंटरफेस) वरही काम करत आहे, ज्यामुळे युजर्संना आर्काइव्ह चॅटमध्ये पाहता येणार आहे, असे म्हटले आहे. आर्काइव्ह  चॅट्सची येणारी सर्व नोटिफिकेशन म्यूट असणार आहेत. म्हणजेच,  युजर्सला आर्काइव्ह चॅट्समध्ये येणारे मेसेज समजणार नाहीत. हे फिचर पर्यायी असणार आहे, असे WABetaInfo चे म्हणणे आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान