शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर येणार, नको असलेल्या ग्रुपपासून सुटका होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 17:19 IST

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण नको असलेल्या ग्रुपपासून आता आपली सुटका होणार आहे. 

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण नको असलेल्या ग्रुपपासून आता आपली सुटका होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर लाँच करणार आहे.व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने आता आणखी एक जबरदस्त फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर असंख्य ग्रुप असल्याने सर्वच ग्रुपवर चॅट करायला अनेकदा कंटाळा येतो. त्यातच अनेक मंडळी आपली परवानगी न घेता आपल्याला नवनवीन ग्रुपमध्ये सामील करत असतात. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण नको असलेल्या ग्रुपपासून आता आपली सुटका होणार आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.  WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे फीचर 'Privacy' सेक्शन मध्ये असणार आहे. 

WhatsApp आयफोन युजर्स Settings > Account > Privacy > Groups मध्ये हे फीचर असणार आहे. त्यानंतर Everyone, My contact, Nobody हे तीन पर्याय मिळतील. तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर WhatsApp युजर्स कोणत्याही ग्रुपमध्ये सामील होण्याआधी त्याचं इन्विटेशन पाठवणार आहे. त्यानंतर युजर्स ते इन्विटेशन स्विकारायचं की नाही याबाबत विचार करू शकतात. तसेच ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुम्हाला एक नोटीफिकेशन पाठवण्यात येईल. त्या 'ग्रुप इन्विटेशन' चा विचार करण्यासाठी युजर्सकडे 72 तास असणार आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान