शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp ग्रुपमधील मेसेजवर आता नेमकं कोणाचं असणार नियंत्रण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 09:13 IST

WhatsApp News : व्हॉट्सॲपने २६ जुलैपासून ‘स्कॅम से बचो’ या नावाने एक अभियान सुरू केले आहे. यात ऑनलाइन पेमेंट करताना वापरकर्त्याला एका व्हिडिओद्वारे जागरुक करण्यात येते.

ॲडमिनला व्हॉट्सॲप ग्रुपवर संपूर्ण नियंत्रण देणारे एक फिचर येत असून त्यानुसार ॲडमिन ग्रुपमधील कोणताही मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ सर्व सदस्यांसाठी डिलिट (डिलिट फॉर एव्हरी वन) करू शकेल. प्रारंभी हे फिचर काही बीटा टेस्टर्ससाठी जारी केले जाणार आहे.

असे तपासा...

तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये हे फिचर काम करतेय की नाही, हे पाहण्यासाठी तुम्ही ॲडमिन असलेल्या ग्रुपमधील कोणताही मेसेज डिलिट करण्याचा प्रयत्न करून पाहा. त्यात ‘डिलिट फॉर एव्हरी वन’ असा पर्याय येत असेल, तर समजून चला की तुम्हाला हे फिचर मिळाले आहे. 

फिचरचे नाव काय? 

सूत्रांनी सांगितले की, नव्या फिचरचे नाव ‘ॲडमिन डिलिट’ असे असेल. हे फिचर व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड २.२२.१७.१२ बिटा व्हर्जनवर जारी केले जाईल. ‘वाबीटा इन्फो पोर्टल’ने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सॲप ॲडमिनला डिलिट फॉर एव्हरी वनचा अधिकार देणारे फिचर काही भाग्यशाली बीटा टेस्टर्स वापरकर्त्यांनाच मिळणार आहे. ॲडमिनने मेसेज डिलिट केल्यानंतर सगळ्यांना दिसेल की, मेसेज ॲडमिनने डिलिट केला आहे. 

अशी करा प्रक्रिया... 

- व्हॉट्सॲपच्या चॅटमध्ये जाऊन डिलिट करू इच्छिता त्या मेसेजवर बोट ठेवा - मेसेजवर थोडा वर बोट दाबून ठेवा म्हणजे मेसेज सिलेक्ट होईल. - जास्त मेसेज डिलिट करायचे असतील तर त्यांच्यावरही बोट ठेवून सिलेक्ट करा.  - आता वरील डिलिट म्हणजेच डस्टबिन आयकॉनवर बोट ठेवा.  - डिलिट फॉर एव्हरी वन’ पर्याय निवडा. मेसेज डिलिट होईल. 

‘कीप मेसेज’वरही सुरू आहे काम 

गायब होणारा मेसेज ठराविक अवधीनंतर डिलिट होतो. असे मेसेज महत्त्वपूर्ण वाटल्यास ते जपून ठेवण्यासाठी एक फिचर आणले जाणार आहे. त्यास ‘कीप द डिसअपिअरिंग मेसेज’ असे नाव देण्यात आले आहे.

घोटाळ्यापासून वाचा 

व्हॉट्सॲपने २६ जुलैपासून ‘स्कॅम से बचो’ या नावाने एक अभियान सुरू केले आहे. यात ऑनलाइन पेमेंट करताना वापरकर्त्याला एका व्हिडिओद्वारे जागरुक करण्यात येते. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान