शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

WhatsApp आता घेऊन येणार Gmail सारखे फिचर ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 14:38 IST

आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp ) आता एका नवीन फीचरवर काम करत आहे. त्यामुळे युजर्स स्पॅम मेसेजला लेबल करु शकतील, अशी माहिती  WhatsApp मधील होणारे बदल ट्रॅक करणा-या ट्विटर युजर WaBetaInfo च्या हवाल्याने मिळाली आहे. येणारे नवीन फिचर हे जीमेलमध्ये सुद्धा आहे. 

मुंबई : आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp ) आता एका नवीन फीचरवर काम करत आहे. त्यामुळे युजर्स स्पॅम मेसेजला लेबल करु शकतील, अशी माहिती  WhatsApp मधील होणारे बदल ट्रॅक करणा-या ट्विटर युजर WaBetaInfo च्या हवाल्याने मिळाली आहे. येणारे नवीन फिचर हे जीमेलमध्ये सुद्धा आहे. WaBetaInfo (@wabetainfo) च्या माहितीनुसार, WhatsApp अशा एका फिचर्सवर काम करत आहे. ते म्हणजे युजर्स अनोखी सेंडरला स्पॅम मार्क करु शकतील. हे फीचर आगामी अपडेट व्हर्जन 2.17.430 मध्ये येणार आहे. यासोबतच युजर्स अशा सेंडर्सना रिपोर्ट किंवा ब्लॉक सुद्धा करु शकणार आहेत. विशेष करुन संबंधित फीचर आयओएस आणि अँड्रॉईड सिस्टिमवर वापरण्यासाठी तयार करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने नव्या वर्षात गुपचूपपणे नवे फिचर आणले. फक्त अँड्रॉईडच्या बिटा फोनसाठी अपडेट आणले आहे. या नव्या अपडेटनुसार वॉईस कॉल आणि व्हिडीओ स्विच करण्यात येणार आहे. या नव्या फिचरमुळे कॉल सुरु असताना वॉईस कॉल की व्हिडिओ कॉल असा पर्याय उपलब्ध होणार आहे. गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपकडून या नव्या फिचरची चाचपणी सुरु होती. सध्या फक्त बिटा 2.18.4 वर्जनसाठी ही सुविधा सुरु आहे. WABetaInfo नेच याबाबतची माहिती दिली होती. कंपनी कॉल स्विचच्या फिचरला यूजर्ससाठी आधिक सोप करत आहे, त्यासाठी त्यांनी क्विक स्विच बटन स्क्रिनवर उपलब्ध करुन दिले आहे. ते क्लिक कताचाच व्हिडीओ आणि व्हाईस कॉल स्विच करता येईल. 

व्हॉट्सअॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा खच, भारतातून तब्बल २ अब्ज संदेशांची देवाणघेवाण 

ववर्षाच्या शुभेच्छा देताना रात्री बरोबर १२ वाजता व्हॉट्सअॅप तब्बल २ तास बंद पडलं होतं. त्यानंतर अनेकांनी व्हॉट्सअॅप बंद पडल्याच्या तक्रारी ट्विटरद्वारे द्यायला सुरुवात केली होती. २ तासांनी व्हॉट्सअॅप सुरू झालं तेव्हा कित्येकजण झोपी गेले होते. पण आता अशी माहिती समोर येतेय की, नवीन वर्षात शुभेच्छा देण्यासाठी तब्बल २० अब्ज संदेश भारतीयांकडून पाठविण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपनेच याविषयी अधिकृत माहिती दिलीय. आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी आकडेवारी असल्याचंही सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप खरंतर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं अॅप आहे. आजवर मॅसेजिंगचे असंख्य अॅप आले. मात्र तरीही व्हॉट्सअॅपची जागा कोणत्याच अॅपने घेतली नाही. रोज असंख्य मॅसेज या व्हॉट्सअॅपद्वारे केले जातात. आजवर जगभरात जवळपास २ बिलिअन युजर्स व्हॉट्सअॅपला लाभले आहेत.  

WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!

नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त अॅप ऐवजी नोटिफिशेकचा वापर करु शकतो. तसेच, फोनच्या होमस्क्रीन बटनवर जास्तवेळ प्रेस केल्यानंतर Widgets > Activities > Settings > Notification log येऊ शकते.  मात्र, फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरे वाचता येऊ शकतील. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप