शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

Whatsapp च्या नव्या पॉलिसीचा युजर्सने घेतला धसका; अल्पावधीत "या" नव्या मेसेजिंग अ‍ॅपची वाढली क्रेझ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 20:55 IST

Whatsapp News : व्हॉट्सअ‍ॅपने युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे.

नवी दिल्ली - Whatsapp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा धसका घेतला असून त्याच्यासारखाच दुसरा पर्याय सध्या शोधत आहेत. प्रायव्हसीला धोका नसेल आणि वापरायला ही अगदी सोपं असेल अशा अ‍ॅपचा शोध युजर्स घेत आहेत. याच दरम्यान अल्पावधीतच एका अ‍ॅपची क्रेझ वाढली आहे. सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संख्या ही झपाट्याने वाढल्याने सिग्नल मेसेंजरवर व्हेरिफिकेशन कोड उशिराने येत आहे. या अ‍ॅपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाईडलाइन जारी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारी युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. 8 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा यूज करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या युजसाठी या नियम व अटीला अ‍ॅक्सेप्ट करावे लागणार आहे. जर अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाईल असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या घोषणेनंतर युजर्सची चिंता वाढली आहे. त्यामुळे ते सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सकडे जाण्यासाठी तयार होत आहेत. टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन अ‍ॅलन मस्क यांनी गुरुवारी नव्या युजर्सला सिग्नलसोबत जोडण्याचे आवाहन केले आहे.

सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही तर फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या लेटेस्ट व्हर्जनसोबत एक ग्रूप कॉल लाँच केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. तर टेलिग्राम पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉन्टॅक्ट इन्फो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो. गुरुवारी सिग्नलने ट्विट करून अनेक प्रोव्हाइडर्स कडे व्हेरिफिकेशन कोड लेट आले. कारण, नवीन लोक मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर जोडण्याचा प्रयत्न करीत होते. कंपनीने एक गाईडलाइन सुद्धा शेअर केली आहे. 

सिग्नल जॉइन करायचंय? मग "हे" करा 

- सिग्नलवर सर्वात आधी एक ग्रूप (Group) करा.

- ग्रूप सेटिंग्सवर जा आणि ग्रूप लिंकवर (Group link)  टॅप करा.

- ग्रूप लिंक क्रिएटसाठी टॉगल (Toggle) ऑन करा आणि शेअरवर टॅप करा.

- यानंतर तुमच्या आवडीच्या जुन्या मेसेंजर अ‍ॅपवर शेअर करा.

ग्रूप तयार झाल्यानंतर "हे" करा

- जे लोक या ग्रूपला जोडू इच्छितात ते लिंक शेअर करू शकतात.

- ग्रूपमध्ये नवीन मेंबर्सला अप्रूव्ह करण्यासाठी टॉगल ऑन-ऑफ करा. शेअर लिंकद्वारे नव्या मेंबर्सला यात रिक्वेस्ट येईल.

- नवीन मेंबर्सला अ‍ॅड करण्याआधी तुम्हाला ग्रूप अ‍ॅडमिनकडून अप्रूव्हल घ्यावे लागेल.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल