शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

खूशखबर! WhatsApp चे 3 नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; फोटो आणि Video पाठवणाऱ्यांची मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:36 IST

WhatsApp : WhatsApp वरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करणं सोपं होणार आहे. WhatsApp चे नवीन फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी आणण्यात आले आहे.

जर तुम्ही WhatsApp च्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ पाठवत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp ने 3 नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत. त्यामुळे WhatsApp वरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करणं सोपं होणार आहे. WhatsApp चे नवीन फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी आणण्यात आले आहे. WhatsApp च्या तिन्ही फिचर्समुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. 

डॉक्यूमेंट कॅप्शन फीचर

WhatsApp च्या नवीन फिचर्सबद्दल बोलायचे तर WhatsApp ने डॉक्युमेंट कॅप्शन फीचर आणले आहे. यासोबतच एक मोठा ग्रुप सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शन फीचर देण्यात आले आहे. म्हणजे, एखादे डॉक्युमेंट शेअर करण्यापूर्वी, तुम्ही त्याच्याशी संबंधित माहिती देऊ शकाल.

मीडिया फाईल शेअरिंग ऑप्शन

WhatsApp ने मीडिया फाईल शेअरिंगचा पर्याय दिला आहे, ज्याच्या मदतीने युजर्स एकाच वेळी 100 मीडिया फाइल्स शेअर करू शकतात. याच्या मदतीने WhatsApp च्या माध्यमातून मोठ्या फाइल्स सहज शेअर करता येतात. यापूर्वी एकाच वेळी 30 मीडिया फाइल्स पाठवता येत होत्या. तसेच अवतार फीचर आणण्यात आले आहे.

अवतार फीचर

WhatsApp ने अवतार फीचर आणलं आहे. म्हणजे तुम्ही WhatsApp वर अवतार आणि कॅरेक्टर स्टाईलसह उत्तर देऊ शकाल. यासोबत प्रोफाईल फोटोमध्ये तुम्ही अवतार किंवा स्टिकर्स लावू शकाल. यासह, युजर्ससाठी चॅटिंग मजेदार होणार आहे.

डाउनलोडसाठी उपलब्ध आहे फीचर

हे फीचर युजर्सना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. WhatsApp चं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. WhatsApp गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान