शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपवर ब्लू टिक बंद असतानाही 'या' सोप्या पद्धतीने समजेल तुमचा मेसेज वाचला गेला की नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 11:31 IST

व्हॉट्सअॅपवर एक अशी पद्धत आहे ज्यामुळे रीड रिसीप्ट बंद असतानाही समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला आहे की नाही ? ते तुम्हाला समजेल. 

मुंबई- व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅप्लिकेशनवर ब्लू टिक फीचर आहे. या ब्लू टिकमुळे तुमचा मेसेज तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज केला त्याने वाचला ते समजतं. तसंच तुम्हाला आलेला मेसेज वाचला गेला की नाही हेही समजतं. या ब्लूक टिकला रीड रिसीप्ट असं म्हणतात. काही व्हॉट्सअॅप युजर्स प्रायव्हसीचा विचार करून रीड रिसीप्ट बंद ठेवतात. मेसेज वाचला आहे की नाही, हे समोरच्याला समजू नये यासाठी रीड रिसीप्ट बंद केलं जातं. पण व्हॉट्सअॅपवर एक अशी पद्धत आहे ज्यामुळे रीड रिसीप्ट बंद असतानाही समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला आहे की नाही ? ते तुम्हाला समजेल. व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला मेसेजेस वाचले गेले असल्याची माहिती करून घेता येईल. व्हॉट्सअॅपने 2014मध्ये रीड रिसीप्ट फीचर लॉन्च केलं. यामुळे मेसेज वाचले गेल्याची माहिती मेसेज पाठविणाऱ्या मिळू लागली. रीड रिसीप्ट बंद असेल तर व्हिडीओ व मेसेज वाचले व पाहिले गेले आहेत की नाही? हे समजत नाही. पण हे फीचर व्हॉइस मेसेजच्या बाबतीत लागू होत नाही. 

त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्रेण्डलिस्टमधील रीड रिसीप्ट बंद असणाऱ्या व्यक्तीला मेसेज पाठविल्यावर त्याने तो मेसेज वाचल्याचं समजून घेण्यासाठी व्हॉइस क्लिपचा पर्याय वापरू शकता. मेसेज पाठविलेल्या व्यक्तीने व्हॉइस क्लिप पाहिल्यावर दोन ब्लू टिक येतात यामुळे तुमचे मेसेज वाचले गेल्याचं व ती व्यक्ती ऑनलाईन असल्याचं सहजपणे समजेल. 

याशिवाय व्हॉट्सअॅपने डिलीट फॉर एव्हरीवन फीचरला अपडेट केलं आहे. या अपडेटमध्ये युजरला पाठविलेला मेसेज 4096 सेकंदात म्हणजेत 68 मिनिटं आणि 16 सेकंदात डिलीट करता येणार आहे. याआधीच्या अपडेटमध्ये पाठविलेला मेसेज 7 मिनिटात डिलीट करण्याची सुविधा देण्यात आली होती. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअॅप