शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं आता धमाकेदार फीचर; पाठवण्याआधी ऐकता येणार Voice Message

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:01 IST

WhatsApp Voice Messages Feature : एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. Voice Messages साठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल.

नवी दिल्ली - इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्य़ा युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर आणत असतं. असंच एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. Voice Messages साठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल. युजर्स WhatsApp वर वॉइस मेसेज सेंड करण्याआधी ऐकू शकतील. यामुळे योग्य वॉइस मेसेज पाठवण्यासाठी मदत मिळेल. WhatsApp चे वॉइस मेसेजेस फीचर लोकप्रिय आहे. यामुळे वॉइस मेसेज करण्याची व ऐकण्याची सुविधा मिळते. 

WhatsApp वर वॉइस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर आतापर्यंत पुन्हा ऐकता येत नव्हतं. पण आता नवीन फीचरमुळे वॉइस मेसेज पाठवण्याआधी युजर्सला ऐकता येणार आहे. यासाठी तुम्हाला WhatsApp वर एखादा व्यक्ती किंवा ग्रुप चॅट ओपन करावे लागेल. चॅट ओपन केल्यानंतर मायक्रोफोनवर टच करा आणि स्लाइड अप करून हँड्स-फ्री रेकॉर्डिंगला लॉक करा. त्यानंतर तुम्ही वॉइस रेकॉर्ड करू शकता. बोलणे पूर्ण झाल्यानंतर स्टॉपवर टॅप करा. 

प्लेवर टॅप करून आता तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. युजर्स टाइम स्टँपद्वारे रेकॉर्डिंगच्या कोणताही भाग ऐकू शकतील. रेकॉर्डिंग न आवडल्यास ट्रॅशवर टॅप करून वॉइस मेसेजला डिलीट करता येईल. जर तुम्हाला वॉइस मेसेज योग्य वाटत असल्यास सेंडवर क्लिक करून इतर युजर्सला पाठवू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. कसं ते जाणून घेऊया...

नंबर सेव्ह न करता असा करू शकता WhatsApp मेसेज

- सर्वाप्रथम फोनवर वेब ब्राऊजर ओपन करा.

- त्यानंतर http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx या लिंकला एड्रेस बारमध्ये पेस्ट करा.

- xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोड टाकून कॉन्टॅक्ट नंबर एंटर करा.

- आता फोनमध्ये एंटर बटणवर क्लिक करा.

-  त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. ज्यावर हिरव्या रंगाचे मेसेज बटण दिसेल.

- त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हॉट्सअ‍ॅप ओपन होईल.

- येथून तुम्ही नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकता.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान