शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp स्टेटसमध्ये येतंय नवीन Creation टूल्स, युजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव होणार अधिक मजेदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:33 IST

कंपनी आता स्टेटससाठी एक नवीन फीचर आणत आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सध्या सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे ३.५ अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. अशा परिस्थितीत युजर्सच्या सोयीसाठी कंपनी या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स अ‍ॅड करत असते. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (WhatsApp Status)  सेक्शनवर सतत काम करत आहे. कंपनी आता स्टेटससाठी एक नवीन फीचर आणत आहे.

अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये खास लोकांना मेन्शन करण्याचे फीचर आणले होते. यासोबतच स्टेटसमध्ये म्युझिक लावण्याचे फीचर देखील आणले होते. आता कंपनी स्टेटस सेक्शनसाठी एक नवीन क्रिएशन टूल आणणार आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना लवकरच त्यांच्या स्टेटसमध्ये अनेक नवीन टूल्स मिळणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी फीचर्स आणि अपडेट्सवर लक्ष ठेवणारी वेबसाइट Wabetainfo कडून नवीन फीचरबाबत माहिती समोर आली आहे. Wabetainfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp beta for Android 2.25.3.2 व्हर्जनमध्ये आगामी क्रिएशन टूल्स स्पॉट करण्यात आले आहे. या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट Wabetainfo ने देखील शेअर केला आहे.

Wabetainfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये असे दिसून येत आहे की, युजर्सना लवकरच गॅलरी सेक्शनमध्ये स्टेटससाठी दोन शॉर्टकट मिळतील. या शॉर्टकट टूल्सद्वारे युजर्सना टेक्स्ट स्टेटस आणि व्हॉइस मेसेज स्टेटसचे वेगवेगळे सेक्शन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये...नवीन फीचर रोल आउट झाल्यानंतर युजर्सना स्टेटस सेक्शनमध्ये फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्टसह एक नवीन व्हॉइस मेसेज सेक्शन स्वतंत्रपणे दिसेल. या ऑप्शनमुळे युजर्सना व्हॉइस नोट्स थेट व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये जोडता येतील. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये  व्हॉइस नोट्स जोडण्याची सुविधा सध्या मिळते. परंतु यासाठी वेगळा ऑप्शन देण्यात आलेला नाही. तसेच, हे आगामी फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि कंपनी लवकरच ते लाँच करू शकते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान