शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:42 IST

जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत.

WhatsApp युजर्ससाठी कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत. उदाहरणार्थ, जर समोरच्या व्यक्तीने तुमचा कॉल उचलला नाही, तर आता तुम्ही त्याला 'व्हॉइस किंवा व्हिडिओ नोट पाठवून कॉल उचलण्यास सांगू शकता. हे फीचर आयफोनसारखं आहे, जिथे व्हॉइस मेल पाठवण्याची सुविधा दिली जाते. याव्यतिरिक्त, ग्रुप कॉल स्पीकर आणि डेस्कटॉप युजर्ससाठी नवीन मीडिया टॅब आणला गेला आहे.

कॉल कॅटेगरीमध्ये आले ३ नवीन फीचर्स

WhatsApp ने कॉल कॅटेगरीमध्ये ३ नवीन फीचर्स सादर केले आहेत.

मिस्ड कॉल मेसेजेस - अनेकदा असं होतं की तुम्ही कोणाला कॉल केला आणि समोरची व्यक्ती तुमचा कॉल उचलू शकली नाही किंवा उत्तर देऊ शकली नाही. अशा परिस्थितीत, आता तुम्ही व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट रेकॉर्ड करून पाठवू शकाल. याचा फायदा असा होईल की जेव्हा समोरची व्यक्ती App उघडेल, तेव्हा एका टॅपमध्येच त्याला तुमचा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट मिळेल.

व्हॉइस चॅटमध्ये रिॲक्शन - आता तुम्ही व्हॉइस चॅट करत असताना थेट मेसेज चॅटमध्ये शिफ्ट होऊ शकाल. व्हॉइस चॅट दरम्यान रिॲक्ट देखील करू शकाल.

ग्रुप कॉल स्पीकर स्पॉटलाइट - यामुळे ग्रुप कॉल करणं पूर्वीपेक्षा अधिक सोयीचं होईल.

डेस्कटॉप/लॅपटॉप युजर्ससाठी नवीन मीडिया टॅब

WhatsApp कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मॅकबुकमध्ये वापरणाऱ्या युजर्सना नवीन मीडिया टॅब मिळेल. आता तुम्ही तुमचे सर्व डॉक्यूमेंट्स, लिंक्स आणि मीडिया फाइल्स चॅट्समध्ये एकाच ठिकाणी शोधू शकता. WhatsAppचं म्हणणं आहे की या फीचरमुळे Mac, Windows आणि Web वर फाइल्स शोधणं आणि काम करणे खूप जलद होईल.

स्टेटस आणि चॅनल झालं आणखी मजेशीर

WhatsApp वर लोक स्टेटस पाहण्यात बराच वेळ घालवतात. आता स्टेटस पूर्वीपेक्षाही जास्त मजेशीर होणार आहेत. आता तुम्ही तुमच्या स्टेटसवर लोकांना प्रश्न विचारू शकाल, ज्यावर लोक उत्तर देऊ शकतील. हे फीचर WhatsApp चॅनल्सवर आणलं गेलं आहे. याच्या मदतीने ग्रुप ॲडमिन त्यांच्या फॉलोअर्सशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतील आणि त्यांना कोणत्याही विषयावर रिअल टाइम उत्तर देखील मिळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Great News for WhatsApp Users: Voice/Video Notes for Missed Calls!

Web Summary : WhatsApp introduces new features: send voice/video notes for missed calls, react in voice chats, improved group calls, and desktop media tab. Status updates get interactive polls, enhancing user engagement and file management across devices.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान