शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या WhatsApp वर भरपूर Group झालेत का? आता टेन्शन विसरा, येतंय नवं फिचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 20:42 IST

WhatsApp नवं फिचर आणतंय ज्यात युजर्सना एक खास सुविधा मिळणार आहे.

WhatsApp New Feature चॅटिंग अ‍ॅप्सचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे WhatsApp. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन अपडेट्स आणत असते. व्हॉट्सअ‍ॅपचे अनेक नवनवीन अपडेट्स वापरकर्त्यांना आनंद देऊन जातात. सध्या मिळत असलेल्या बातम्यांनुसार, व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका नवीन अपडेटवर काम करत आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचा फोन नंबर लपवू शकणार आहात. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले तरीही तुम्ही दुसऱ्यांना दिसू शकणार नाही अशाप्रकारचं हे सेटिंग असणार आहे असं बोललं जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे नवं फिचर यूजर्सच्या प्रायव्हसीशी संबंधित असणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुपमध्ये अ‍ॅड झाल्यानंतरही तुमचा फोन नंबर तुम्हाला लपवता येणार आहे. हे फिचर अद्याप टेस्टर्स साठीदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, कारण या फिचरवरील काम पूर्ण झालेले नाही.

WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना असा पर्याय देणार आहे की कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यानंतर ते त्या ग्रुपच्या लोकांपासून त्यांचा फोन नंबर लपवू शकतील. जेव्हा तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड केले जाईल, तेव्हा तुमचा नंबर लपविला जाईल आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्रुपमधील काही सदस्यांसह तुमचा नंबर सेव्ह करू शकाल. सध्या हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड बीटा 2.222.17.23 वर डेव्हलपमेंट दरम्यान दिसले आहे. असे म्हटले जात आहे की हे अपडेट फक्त Google Play Beta प्रोग्रामद्वारे Android Beta 2.22.17.23 साठी जारी केले जाईल. सध्या ते Apple फोनसाठी आणले जाणार नाही.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान