शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर मेसेज पाठवल्यानंतरही तुम्ही Edit करू शकणार, लवकरच येणार नवीन फीचर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 13:12 IST

WhatsApp Update : सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात, पण एडिट केले जाऊ शकत नाहीत, मात्र या आगामी फीचरमुळे यूजर्स पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकतील.

WhatsApp Update : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नव-नवीन फीचर्स येत आहेत. आता कंपनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एडिट बटण हे फीचर आणणार आहे. अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये एडिट बटणाची टेस्टिंग करत आहे. 

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर कोणतेही एडिट बटण नाही. तसेच, सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले मेसेज डिलीट केले जाऊ शकतात, पण एडिट केले जाऊ शकत नाहीत, मात्र या आगामी फीचरमुळे यूजर्स पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकतील. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरनंतर आता व्हॉट्सअ‍ॅप टेक्स्ट मेसेज एडिटिंग फीचर देत आहे, जे आगामी अपडेटसह सादर केले जाऊ शकते. 

WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, त्यामध्ये असे दिसते की, व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन ऑप्शन विकसित करत आहे, ज्यामुळे मेसेज एडिट करता येईल. याच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवल्यानंतरही त्यांची चूक सुधारू शकतील, परंतु हे फीचर सध्या विकसित केले जात आहे. त्यामुळे याचा अर्थ असा होतो की आगामी काळात काही बदल देखील होऊ शकतात.  याचबरोबर, व्हॉट्सअॅप हे फीचर सर्व अँड्रॉइड बीटा, आयओएस बीटा आणि डेस्कटॉपसाठी काम करत आहे, असे समजते. मात्र, या फीचरबद्दल यापेक्षा जास्त माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, अलीकडेच मेसेजिंग अ‍ॅपवर पेमेंट फीचर सादर करण्यात आले आहे. दरम्यान, अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स (WhatsApp Payments)फीचर्सच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅक देणे सुरू केले आहे. जे युजर्स आपल्या मित्रांना किंवा कुटुंबियांना व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटद्वारे पैसे पाठवतात, त्यांना कंपनी 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. मात्र, हा कॅशबॅक केवळ तीन वेळा आणि तीन वेगवेगळ्या नंबरवर पैसे पाठवल्यास मिळणार आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान