शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक डाऊन; तांत्रिक अडचणींमुळे वापरकर्ते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 23:27 IST

जगभरात कोट्यवधी वापरकर्ते त्रस्त; न्यूज फीड रिफ्रेश होईना, मेसेजेसची देवाणघेवाण होईना

मुंबई: व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरची सेवा खंडित झाली आहे. अँड्रॉईड, आयओएससोबतच डेस्कस्टॉपवरही समस्या  उद्भवत असल्यानं वापरकर्ते त्रासले आहेत. 

फेसबुक वापरकर्त्यांना न्यूज फीड रिफ्रेश करता येत नाहीए. इन्स्टाग्रामवरही सारखीच परिस्थिती आहे. व्हॉट्स ऍपचा वापर कोट्यवधी लोक करतात. दर तासाला अब्जावधी मेसेजची देवाणघेवाण होते. मात्र व्हॉट्स ऍपची सेवा ठप्प झाल्यानं वापरकर्ते हैराण झाले आहेत.

व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचे सर्व्हर डाऊन झाल्यानं जगभरात कोट्यवधी लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.डाऊन डिटेक्टर या संकेतस्थळानुसार, १३ हजारांहून अधिक जणांनी व्हॉट्स ऍपचा वापर करताना समस्या उद्भवत असल्याची तक्रार केली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरत असताना अडथळे येत असल्याची तक्रार नोंदवणाऱ्यांची संख्यादेखील हजारोंच्या घरात आहे. कोट्यवधी लोकांना व्हॉट्स ऍपवरून मेसेज पाठवण्यात अडचणी येत आहेत. समोरून मेसेजदेखील येत नाहीएत. लवकरात लवकर समस्या सुटेलसर्व्हर डाऊन झाल्यानं गेल्या पाऊण तासापासून व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचा वापर करता येत नाहीए. अनेकांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यांनाही त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये पोहोचण्यासाठी ट्विटरचाच आधार घ्यावा लागला आहे. 'काहींना आमच्या सेवेचा वापर करताना अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. तसदीबद्दल क्षमस्व,' असं ट्विट फेसबुक, व्हॉट्स ऍपनं केलं आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकTwitterट्विटर