शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 21:10 IST

WhatsApp India Head Resigns : या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही राजीनामा दिला होता.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप इंडिया (WhatsApp India) या मेसेजिंग अ‍ॅपचे प्रमुख असलेले अभिजित बोस आणि मेटा इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल (Rajiv Aggarwal) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवनाथ ठुकराल यांची व्हॉट्सअ‍ॅप इंडियासह मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते व्हॉट्सअ‍ॅप इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डिपार्टमेंटचे प्रमुख होते. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाने अलीकडेच आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. दुसरीकडे, या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही राजीनामा दिला होता.

अभिजित बोस यांच्या राजीनाम्याची माहिती देताना व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट ( Will Cathcart) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने अभिजित बोस यांचे आभार मानू इच्छितो. व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे पहिले प्रमुख म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्या आहेत. त्यांनी आमच्या सेवा लोकांना अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातील करोडो लोकांना आणि व्यवसायांना याचा फायदा झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅप इंडिया भारतात व्यवसाय वाढवण्यासाठी काम करत राहील. यासोबतच लवकरच व्हॉट्सअ‍ॅप इंडियाच्या प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अभिजित बोस यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांच्या पुढील प्लॅनिंगबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, परंतु मेटा इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर राजीव अग्रवाल यांच्याबद्दल कंपनीने सांगितले की, त्यांनी एका चांगल्या संधीच्या शोधात राजीनामा दिला आहे. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप इंडियाने दोघांनाही चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

फेसबुक इंडियाच्या प्रमुखानेही दिलाय राजीनामायापूर्वी, फेसबुकची (Facebook) पेरेंट कंपनी मेटा इंडियाचे (Meta India) भारतातील प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही 3 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या राजीनाम्यानंतर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटमध्ये (Social Media Platform Snapchat) सामील होणार आहेत. मोहन हे आशिया-पॅसिफिकचे प्रमुख म्हणून काम पाहतील.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानFacebookफेसबुकMetaमेटा