शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

WhatsApp ग्रुपमध्ये सदस्यांची मनमानी चालणार नाही; Group Admin ला मिळणार ‘पॉवर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 18:25 IST

लोकांच्या भावना भडकावणे, दंगल घडवणे यासारखे चुकीचे अफवा पसरवणारे मेसेज व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल होतात

मागील काही वर्षापासून सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यात फेसबुक पाठोपाठ व्हॉट्सअपनंही अनेकांच्या मनावर भूरळ घातली आहे. WhatsApp च्या माध्यमातून एकाचवेळी अनेकांना मेसेज पाठवले जाऊ शकतात. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जवळपास २५० मेबर समाविष्ट करण्याची मर्यादा आहे. मात्र या ग्रुप सदस्यांपैकी कुणीही काही आक्षेपार्ह मेसेज टाकल्यास ग्रुप Admin वर कारवाईची टांगती तलवार असते.

लोकांच्या भावना भडकावणे, दंगल घडवणे यासारखे चुकीचे अफवा पसरवणारे मेसेज व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल होतात. त्यात एखाद्या ग्रुपमध्ये असा मेसेज आल्यास त्यावर Admin काहीच करु शकत नव्हता. मात्र आता व्हॉट्सअप यूजर्स एक्सपीरियंस वाढवण्यासाठी नवनव्या फिचर्सची भर पडली आहे. आता WhatsApp कडून देण्यात आलेला नवा फिचर ग्रुप एडमिनसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरमुळे ग्रुप एडमिन कुठल्याही मेसेजला सर्वांसाठी डिलीट करु शकतो.

रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, व्हॉट्सअप लवकरच हा फिचर जारी करणार आहे. या फिचरमुळे ग्रुप एडमिनला पहिल्यापेक्षा अधिक अधिकार मिळणार आहेत. ग्रुप एडमिन ग्रुपसाठी योग्य नसलेले मेसेज डिलीट करु शकतील. याबाबत WhatsApp च्या अपकमिंग फिचरवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo साइटवर रिपोर्ट दिला आहे. या वृत्तानुसार, लवकरच व्हॉट्सअप एंड्रॉयर्ड यूजर्ससाठी हा पर्याय उपलब्ध होईल. पुढील फिचरसाठी बीटा अपडेट जारी केला आहे.

स्क्रीनशॉटमध्ये दाखवण्यात आलंय की, जर कुठल्याही मेसेजला ग्रुप एडमिननं डिलीट केले तर त्याखाली एक नोट डिस्प्ले असेल ज्यात हा मेसेज एडमिननं डिलीट केल्याची माहिती दिसेल. त्यामुळे ग्रुपमधील इतर यूजर्सना सहजपणे ग्रुप एडमिननं हा मेसेज डिलीट केल्याचं कळेल. या फिचरमुळे ग्रुप एडमिनकडे ग्रुपची पॉवर असेल. तो अनावश्यक, अफवा पसरवणारे, चुकीचे मेसेज डिलीट करु शकतो. परंतु हा फिचर सर्वांसाठी येण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. WhatsApp आपल्या युजर्संना अनुभव अधिक चांगला करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणते.  काही दिवसांपूर्वी WhatsApp वर चॅट बेस्ड वॉलपेपर सपोर्ट जोडण्यात आले होते. ज्याद्वारे युजर्स प्रत्येक चॅट आणि ग्रुपवर वेगवेगळे चॅट बॅकग्राउंड सेट करू शकतात. तसेच, WhatsApp वर व्हॉईस कॉल करताना, डिफॉल्ट स्क्रीन बॅकग्राउंड होईल

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप