शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर तुम्हीही Good Morning वाले मेसेज पाठवता? मग तुमचंही अकाऊंट होऊ शकत बॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 17:34 IST

तुम्ही WhatsApp वर Good Morning चे मेसेज दररोज कुणाला पाठवत असाल किंवा फॉरवर्ड करत असाल तर सावधान. कारण असं केल्यानं तुमचं WhatsApp अकाऊंट आता बॅन होऊ शकतं.

नवी दिल्ली-तुम्ही WhatsApp वर Good Morning चे मेसेज दररोज कुणाला पाठवत असाल किंवा फॉरवर्ड करत असाल तर सावधान. कारण असं केल्यानं तुमचं WhatsApp अकाऊंट आता बॅन होऊ शकतं. एका अहवालानुसार वारंवार ज्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवरुन गुडमॉर्निंग, गुडनाइटचे मेसेजेस पाठवले जातात असा अकाऊंट्सना स्पॅम अकाऊंट म्हणून ग्राह्य धरलं जाण्याची शक्यता असते. याशिवाय तुम्ही तर एखादा चुकीचा मेसेज एकाचवेळी अनेकांना फॉरवर्ड केला तरी तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. 

आपण अनेकदा भारतीय व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट्स बॅन करण्यात आल्याची बातमी ऐकलीच असेल. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी व्हॉट्सअ‍ॅपकडून बंदीची कारवाई करण्यात येते. तुमचं अकाऊंट कोणकोणत्या कारणांमुळे बॅन केलं जाऊ शकतं याची अनेक कारणं WhatsApp ने शेअर केली आहेत. 

जर तुम्ही सर्वच मेसेज जास्तीज जास्त लोकांना फॉरवर्ड करत असाल तर तुमचं अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं. त्यामुळे मेसेजेस फॉरवर्ड करण्यावर आपण स्वत:च बंधन घालणं गरजेचं आहे. ज्या मेसेजची सत्यता तुम्हाला माहित नाही असे मेसेज फॉरवर्ड करणं टाळलं पाहिजे. तसंच चुकीचा संदेश देणारे मेसेजेसही फॉरवर्ड करुन नयेत. त्यामुळे अकाऊंटवर बंदी घातली जाऊ शकते. 

फिचर्सचा चुकीचा वापर करू नकाWhatsApp च्या ब्रॉडकास्ट फीचरचा चुकीचा वापर केल्यास तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. या फिचरचा उपयोग एकाचवेळी अनेकांना मेसेज पाठवण्यासाठी केला जातो. पण तुम्ही चुकीचा मेसेज पाठवत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तसंच ज्या व्यक्तींना तुम्ही मेसेज पाठवत आहात त्यांच्याकडे तुमचा मोबाइल नंबर सेव्ह असणं गरजेचं आहे. 

तुम्ही जर एखाद्याच्या परवानगीविना त्याला एखाद्या ग्रूपमध्ये अ‍ॅड करत असाल तरीही तुमचं अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं. कंपनीच्या म्हणण्यानुसार एखादा व्यक्ती जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यापासून रोखत असेल तर अशा व्यक्तींना त्रास देऊ नका अन्यथा अकाऊंटवर बंदीची कारवाई करण्याची नामुष्की ओढावेल. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे WhatsApp च्या पॉलिसीची उल्लंघन करू नका. यामुळे तुमचं अकाऊंट ब्लॉक होऊ शकते. तसंच कंपनीकडून चुकून तुमचं अकाऊंट बॅन केलं गेलं असेल तर तुम्ही त्याविरोधात अपील करू शकता. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान