शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲपचे अखेर एक पाऊल मागे, नवीन धोरणासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 02:00 IST

डेटा शेअरिंगबाबत व्हॉटस्‌ॲपने नवीन धोरणाची आखणी केली आहे. त्यातच आपल्या नव्या धोरणाच्या अटी-शर्तींचा ८ फेब्रुवारीपर्यंत स्वीकार न केल्यास अकाऊंट डिलिट केले जाईल, असा इशारा व्हॉटस्‌ॲपने दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांची नाराजी व्हॉटस्‌ॲपने ओढवून घेतली.

नवी दिल्ली : आमच्या नव्या धोरणासंदर्भातील अटी-शर्तींचा स्वीकार करा, अन्यथा तुमचे अकाऊंट डिलिट केले जाईल, असा इशारा देणाऱ्या व्हॉटस्‌ॲपने तूर्तास एक पाऊल मागे घेतले आहे. वापरकर्त्यांना नव्या धोरणाचा स्वीकार करण्यासाठी दिलेली ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत व्हॉटस्‌ॲपने आता १५ मेपर्यंत वाढविली आहे.डेटा शेअरिंगबाबत व्हॉटस्‌ॲपने नवीन धोरणाची आखणी केली आहे. त्यातच आपल्या नव्या धोरणाच्या अटी-शर्तींचा ८ फेब्रुवारीपर्यंत स्वीकार न केल्यास अकाऊंट डिलिट केले जाईल, असा इशारा व्हॉटस्‌ॲपने दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांची नाराजी व्हॉटस्‌ॲपने ओढवून घेतली. अनेकांनी व्हॉटस्‌ॲपचा त्याग करीत सिग्नल वा टेलिग्राम या तुलनेने नव्या संदेशवहन मंचांचा स्वीकार केला. भारतात व्हॉटस्‌ॲपचे तब्बल ४० कोटी वापरकर्ते आहेत. एवढी मोठी बाजारपेठ हातची जाईल, या भीतीने व्हॉटस्‌ॲपने वापरकर्त्यांच्या नाराजीची तातडीने दखल घेत नव्या धोरणाची अंमलबजावणी पुढे ढकलली.नव्या भूमिकेविषयी...- वापरकर्त्याचे अकाऊंट ८ फेब्रुवारीला डिलिट होणार नाही- खासगीपणा आणि सुरक्षितता यासंदर्भातील अपप्रचाराला तपशीलवार उत्तरे देणार- नवीन धोरण अमलात येण्यापूर्वी खासगीपणा वा डेटा वापर यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईल- उलटपक्षी नव्या धोरणात लोकांना नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत- नवीन धोरण अधिकाधिक पारदर्शी असेल

जनजागृतीवर भर -नव्या धोरणाचा पुनर्विचार करीत १५ मेपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे व्हॉटस्‌ॲपने स्पष्ट केले. तोवर नव्या धोरणाविषयी व युझर्सच्या खासगीपणाच्या अधिकाराची हमी देण्यासंदर्भात व्हॉटस्‌ॲपतर्फे जनजागृती केली जाणार आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया