शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर असं अ‍ॅक्टिव्ह करा डार्क मोड फीचर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 13:58 IST

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे.कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत आहे. गुगल क्रोम (Google Chrome) आणि इतर काही गुगल अ‍ॅप्स (Google Apps) सोबत  फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचरचा समावेश केला आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी डार्क मोड फीचरचे काही फोटो हे लीक झाले होते. मात्र हे फीचर युजर्सना कधी उपलब्ध होणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 

गुगल क्रोम (Google Chrome) आणि इतर काही गुगल अ‍ॅप्स (Google Apps) सोबत फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचरचा समावेश केला आहे.  Android  फोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन  Android Q च्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का हे तपासून घ्या. अनेक Andorid Mobile फोन Android Q च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. या लिस्टमध्ये गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे. 

Android फोनवर असं करा Dark Mode फीचर ऑन 

- सर्वप्रथम स्मार्टफोनच्या ‘Settings’ मध्ये जाऊन ‘Display’ ऑप्शनवर टॅप करा. 

- ‘Select Theme’ वर टॅप करून Dark ऑप्शनवर क्लिक करा.

- Settings मध्ये खाली देण्यात आलेल्या ‘Developers Options’ वर जा. 

- Settings मध्ये Developers Options टॅब येत नसेल तर Settings मध्येAbout phone असलेल्या Build number वर सात वेळा क्लिक कर अ‍ॅक्टिवेट करू शकता. त्यानंतर Settings मध्ये Developers Options चा समावेश होईल.

- WhatsApp Settings मध्ये जाऊन ‘Wallpaper’ ऑप्शनवर क्लिक करून ‘None’ वर क्लिक करा असं केल्यास व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडवर काम करेल. 

iOS वर असं करा Dark Mode फीचर ऑन 

- सर्वप्रथम  iPhone च्या ‘Settings’ वर जा. तिथे ‘General’ ऑप्शनवर क्लिक केल्यास ‘Accessibility’ वर क्लिक करा. 

- ‘Display Accommodations’ ऑप्शन दिसेल. त्यामध्ये ‘Invert Colours’ ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘Smart Invert’ ऑप्शनवर क्लिक करणे गरजेचे आहे. 

- असं केल्यास iPhone च्या सर्व अ‍ॅप्समध्ये Dark Theme अप्लाय होईल.

- त्यानंतर  Android प्रमाणे WhatsApp Settings मध्ये जाऊन ‘Wallpaper’ ऑप्शनवर क्लिक करून ‘None’ वर क्लिक करा असं केल्यास व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडवर काम करेल. 

जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद

स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस

1 जुलैपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. 1 जुलैपासून काही स्मार्टफोनवरील व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटेड एफएक्यूनुसार, इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप फेब्रुवारी 2020 नंतर Android आणि iPhone मध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. ब्लॉगमध्ये अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. 1 जुलै 2019 पासून Windows Store मधून व्हॉट्सअ‍ॅप हटवले जाणार आहे. स्टॅटकाऊंटरच्या रिपोर्टनुसार जगभरात फक्त 0.24 टक्के लोक विंडो ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत आहेत. तसेच 31 डिसेंबर 2019 नंतर विंडोज फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं जाणार आहे. कंपनीने आपलं सपोर्ट पेज FAQ वर Android व्हर्जन 2.3.7 आणि त्याआधी ऑपरेटींग सिस्टमवर काम करणार नसल्याचं सांगितलं आहे.  1 फेब्रुवारी 2020 नंतर iOS 7 आणि ऑपरेटिंग सिस्टम (OS) वर असलेल्या आयफोन (iPhone) व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स 

आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार

WhatsApp वर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही, 'हे' आहे कारण

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅप लवकरच सेव्ह आणि अनसेव्ह कॉन्टॅक्टचं प्रोफाईल फोटो डाऊनलोड करण्याचा पर्याय हटवणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अल्बम ले-आऊट आणि ऑडिओ फॉरमॅटमध्ये बदल करणारं फीचर आणणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रोफाईल फोटो सेव्ह करण्याची सोय होती. मात्र आता युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन हे फीचर काढण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने कॉन्टॅक्टसचे प्रोफाईल फोटो कॉपी किंवा शेअर करण्यावर निर्बंध लावले आहेत. पण युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या अनेक ग्रुपचे फोटो डाऊनलोड अथवा शेअर करता येणार आहेत.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान