शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 15:59 IST

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचे चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी देखील व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचे चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये ‘Sticker Notification Preview’ नावाचं नवं फीचर पाहायला मिळणार आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी देखील व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये ‘Sticker Notification Preview’ नावाचं नवं फीचर पाहायला मिळणार आहे. आयओएसच्या बीटा व्हर्जन 2.19.50.21 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. आता लवकरच अँड्रॉईड बीटावर देखील ते पाहायला मिळणार आहे.  

‘Sticker Notification Preview’ हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यानंतर अ‍ॅपवर एखादा मेसेज, स्टीकर, फोटो, व्हिडीओ आल्यावर नोटीफिकेशनमध्ये टेक्स्ट आणि इमोजी येणार आहे. स्टीकरसाठी नोटीफिकेशन बारमध्ये सध्या स्टीकर असं लिहिलेलं दिसतं. मात्र आता या नव्या फीचर नंतर युजर्सना पाठवलेला स्टीकर दिसणार आहे. तसेच मेसेज ओपन न करता कोणता स्टीकर पाठवण्यात आला आहे ते पाहता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं नवं अपडेट गुगल प्ले स्टोरवर बीटा प्रोग्रामचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आले आहे. या व्हर्जनमध्ये स्टीकर प्रिव्यू फीचरची चाचणी करण्यात येत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप Animated stickers वर देखील काम करत असल्याची माहिती मिळत आहे. 

WhatsApp स्टेटसमुळे त्रस्त असाल तर 'ही' ट्रिक करेल मदत

 व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक जण आपली स्टोरी ही स्टेटसवर शेअर करत असतात. मात्र काही वेळेस त्याचा कंटाळा येतो. मात्र या स्टेटसपासून युजर्सना त्यांची सुटका करता येते. व्हॉट्सअ‍ॅपवर कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकांचे स्टेटस दिसत असते. जर युजर्सना ते स्टेटस कायमचं डिलीट करायचं असेल तर सर्वप्रथम फोनचं इंटरनेट बंद करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद करून स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जा. तिथे व्हॉट्सअ‍ॅपला फोर्स स्टॉप करा. यानंतर ही काही वेळ ऑफलाईन राहा म्हणजेच फोनचं इंटरनेट बंद ठेवा. त्यानंतर फोनच्या टाईम सेटींगमध्ये जाऊन तेथे असलेल्या वेळेपेक्षा 24 तास पुढे असलेली वेळ देऊन वेळ बदला. फोनची वेळ बदलल्यानंतर टाईम सेटींग बंद करा. त्यानंतर बंद केलेले फोनचे इंटरनेट सुरू करा. तसेच व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. त्यानंतर कोणाचेही स्टेटस दिसणार नाही. 

 

IPL सीझनसाठी Whatsapp चा स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक, असा करा डाऊनलोड गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅन्डॉईड आणि आयओएस अ‍ॅपवर स्टीकर फीचर आणलं होतं. त्यामध्ये नवनवीन पॅक येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक आणला आहे. क्रिकेट प्रेमी लगेचच हा पॅक डाऊनलोड करू शकतात. सध्या हा स्टीकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसत नाही तर तो अ‍ॅड करावा लागतो. स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक एकदा डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने इमोजीप्रमाणे त्याचा वापर करता येतो. स्टीकर्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात युजर्सकडून केला जातो. 

WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

WhatsApp चं नवं अपडेट, 'या' फीचरच्या जागेत झाला बदल

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. WhatsApp ने अपडेट केल्यानंतर एका फीचरच्या जागेत बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेटमध्ये 'अर्काइव्ड चॅट्स' या फीचरला मेन साइड मेन्यूमध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या हा पर्याय चॅटमध्ये सर्वात खाली दिसत आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्य़ा अपडेटनंतर Archived Chats मेन मेन्यूमध्ये दिसणार आहे. 

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाचत असतं. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान